arrested Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: खंडणीखोर 'वॉल्‍टर गँग'च्या म्‍होरक्‍याला अटक! मुंगूलमध्ये झाला होता खुनी हल्ला; गन आणि गोळ्या जप्त

Mungul Crime: वॉल्‍टर हा दक्षिण गोव्‍यातील कुख्‍यात अशा वॉल्‍टर गँगचा म्‍होरक्‍या आहे. त्‍याचा खात्‍मा करण्‍यासाठी विरोधी गँगच्‍या गुंडांनी मुंगूल येथे त्‍याच्‍या मित्राच्‍या गाडीवर हल्‍ला केला होता.

Sameer Panditrao

मडगाव: मागच्‍या आठवड्यात मुंगूल-मडगाव येथे ज्‍या वॉल्‍टरला मारण्‍यासाठी खुनी हल्‍ला केला गेला, त्‍याच वॉल्‍टर फर्नांडिस याला फातोर्डा पोलिसांनी काल रात्री एका बिल्‍डरला धमकावून २ कोटींची खंडणी मागितल्‍याच्‍या आरोपाखाली अटक केली. या प्रकरणात आत्तापर्यंत चौघांच्‍या मुसक्‍या आवळण्‍यात आल्‍या आहेत. तर, या गँगचा म्‍होरक्‍या वॉल्‍टरकडून एक गन आणि गोळ्‍या जप्‍त केल्‍या आहेत.

वॉल्‍टर फर्नांडिस हा दक्षिण गोव्‍यातील कुख्‍यात अशा वॉल्‍टर गँगचा म्‍होरक्‍या आहे. त्‍याचा खात्‍मा करण्‍यासाठी मागच्‍या आठवड्यात विरोधी गँगच्‍या गुंडांनी मुंगूल येथे त्‍याच्‍या मित्राच्‍या गाडीवर हल्‍ला केला होता. मात्र त्‍यावेळी या गाडीत वॉल्‍टर नसल्‍याने तो बचावला होता. दरम्‍यान, आत्तापर्यंत या वॉल्‍टरविरोधात कोलवा पोलिसांत दोन, फातोर्डा पोलिसांत दोन तर मडगाव पोलिस स्‍थानकात एक गुन्‍हा नोंद आहे. या खंडणी प्रकरणाकडे गँगच्‍या कारवाईचा एक भाग म्‍हणून पाहिले जात आहे.

फातोर्ड्याचे पोलिस निरीक्षक नॅथन आल्‍मेदा यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, या प्रकरणात वॉल्‍टरसह रोहित (काटू) फळदेसाई, तिरुपती वरकुरी व विनोदकुमार थोतड यांना अटक केली आहे. त्‍यापैकी तिरुपती वरकुरी याने अन्‍य दोघांच्‍या साथीने आपल्‍याला एका कॅफेमध्‍ये वॉल्‍टरच्‍या नावाची धमकी देऊन दोन कोटी रुपयांच्‍या खंडणीची मागणी केली, अशी तक्रार फातोर्ड्यातील बिल्‍डर श्रीनिवास थोरवत यांनी काल पोलिसांत दिली होती.

या बिल्‍डरकडून आपल्‍याला कमी पैशात व्‍हिला मिळावा यासाठी वॉल्‍टर गँगकडून ही धमकी देण्‍यात आली होती. या घटनेमुळे दक्षिण गोव्‍यात गुन्‍हेगारीची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत हे स्‍पष्‍ट होते.

मुंगूल गँगवार, फरार राहुल तलवारला अटक

मुंगूल-मडगाव येथे झालेल्‍या गँगवार प्रकरणात आत्तापर्यंत फरार असलेला राहुल तलवार याला फातोर्डा पोलिसांनी आज अटक केली. त्‍यामुळे या प्रकरणात अटक करण्‍यात आलेल्‍यांची संख्‍या आता २० वर पोहोचली आहे.

१२ ऑगस्‍ट रोजी या संशयितांनी वॉल्‍टर गँगचा युवकेश व रफीक या दोघांवर प्राणघातक हल्‍ला चढवला होता. दोन वर्षांपूर्वी वॉल्‍टर गँगकडून झालेल्‍या मारहाणीचा बदला घेण्‍यासाठी हा हल्‍ला करण्‍यात आल्‍याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Toyota Camry Sprint: हायब्रिड सेडान सेगमेंटमध्ये टोयोटाचा पुन्हा धमाका! स्पोर्टी लूक आणि दमदार फीचर्स 'कॅमरी स्प्रिंट एडिशन' लॉन्च

Goa Cabinet Changes: 22 महिन्यांच्या मंत्रिपदानंतर बुधवारी संध्याकाळी सिक्वेरा; गुरुवारी सकाळी सभापती तवडकर देणार राजीनामा तर, कामतांना CM सावंतांकडून मिळाली हिंट

‘PM-CM’ना हटवणारं विधेयक संसदेत सादर, विरोधकांनी अमित शहांना घेरलं; अखेर विधेयक JPC कडे पाठवलं

Viral video Goa: "अरे ChatGPT कोकणी उलय", गोव्यातील तरुणाचा 'हा' व्हिडिओ होतोय Viral

Rekha Gupta Attack: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या 35 वर्षीय व्यक्तीने मारली कानाखाली? हल्लेखोराचा चेहरा समोर, आतिषीनी केला निषेध

SCROLL FOR NEXT