Mungul Firing Case: कोलवा-मुंगूल हल्ला प्रकरणी अजून 5 जणांना अटक

Mungul Firing: मुंगूल येथे गँगवाॅरमध्ये दोन युवकांवर जो जीवघेणा हल्‍ला झाला. या प्रकरणात आतापर्यंत आठजणांना अटक करण्यात आली होती.

मडगाव: मुंगूल येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या गँगवॉरमुळे संपूर्ण गोवा हादरला होता. दोन युवकांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या तपासात आता पोलिसांनी आणखी सहा जणांना अटक केली आहे. याआधी या प्रकरणात आठ जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यामुळे आता अटक झालेल्यांची संख्या चौदा वर पोहोचली आहे.

या हल्ल्यात रफीक तशान (२४) आणि युवकेश सिंग (२०) हे दोघे गंभीर जखमी झाले होते. हल्लेखोरांनी निर्दयपणे मारहाण करण्याबरोबरच गाडीवर गोळीबार करून दहशत माजवली होती. गंभीर जखमी अवस्थेत या दोघांना तत्काळ गोमेकॉ (गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी) येथे हलविण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com