Mungul Gang War Dainik Gomantak
गोवा

Mungul Gang War: मुंगूल गॅंगवॉर प्रकरणातील संशयितांना जामीन मंजूर, 50 हजारांच्‍या हमीवर मुक्‍तीचा आदेश

Goa Mungul Gang War: मुंगूल गँगवॉर प्रकरणातील मुख्‍य संशयित वेली डिकॉस्‍ता याच्‍यासह एकूण १३ संशयितांना दक्षिण गोव्‍याचे अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश राम प्रभूदेसाई यांनी ५० हजारांच्‍या प्रत्‍येकी दोन हमीवर जामीनमुक्‍त केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव : मुंगूल गँगवॉर प्रकरणातील मुख्‍य संशयित वेली डिकॉस्‍ता याच्‍यासह एकूण १३ संशयितांना दक्षिण गोव्‍याचे अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश राम प्रभूदेसाई यांनी ५० हजारांच्‍या प्रत्‍येकी दोन हमीवर जामीनमुक्‍त केले.

जामिनावर असलेल्‍या संशयितांनी पोलीस तपासाला सहकार्य करावे. तसेच तक्रारदार व साक्षीदारांवर दबाव आणण्‍यासारख्‍या गाेष्‍टी करु नये, अशा अटी घातल्‍या आहेत.

व्हॅली डिकॉस्टा, अमर कुलाल, वासू कुमार, मोहन अली, ज्योयस्टन फर्नांडिस, सुनील बिलावर, बाशा शेख, गौरांग कोरगावकर, राजेश वेल्मा, प्रकाश वेल्मा, अविनाश गुंजीकर, धनंजय तलवार व अक्षय तलवार या १३ जणांनी जामिनासाठी अर्ज केला होता. संशयितांच्‍यावतीने ॲड. स्‍पेन्‍सर व्‍हिएगस व ॲड. विवेक नाईक यांनी बाजू मांडली.

दरम्यान, मुंगुल येथे १२ ऑगस्टला गँगवॉरची घटना घडली होती. एकूण २८ जणांना फातोर्डा पोलिसांनी अटक केली होती. त्यातील दीपक कट्टीमणी व परशुराम राठोड या दोघांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला आहे. तर अन्य १३ संशयित सध्‍या न्यायालयीन कोठडीत आहेत.

व्हॅली व वॉल्टर यांच्या गँगच्या संघर्षातून हे टोळीयुद्ध झाले होते. यात युवकेश सिंग व रफिक तैशान हे दोघे गंभीर जखमी झाले होते. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा या  गँगवॉर प्रकरणी सहभाग असल्याचे तपासात आढळून आल्याने या घटनेचे गूढ वाढले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

Imran Khan: भारतीय दिग्गजांचा पाकिस्तानला 'बाऊन्सर'! इम्रान खानच्या मदतीला धावले कपिल देव अन् सुनिल गावस्कर; सरकारकडे केल्या 'या' 3 मागण्या

Firing Video: रक्ताचा खेळ! LIVE सामन्यात अंदाधुंद गोळीबार, अनेकांचा जागीच मृत्यू; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT