Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मडगाव येथील हॉटेलच्या खोलीत आढळला मुंबईच्या व्यक्तीचा मृतदेह, पोलिस तपास सुरू

Mumbai Man Found Dead Margao: मुंबईतील विक्रोळी परिसरातील रहिवासी असलेले ५६ वर्षीय कबीर मुजावर यांचा मृतदेह मडगाव येथील गांधी मार्केटजवळील एका हॉटेलच्या खोलीत आढळला आहे.

Sameer Amunekar

मडगाव: मुंबईतील विक्रोळी परिसरातील रहिवासी असलेले ५६ वर्षीय कबीर मुजावर यांचा मृतदेह मडगाव येथील गांधी मार्केटजवळील एका हॉटेलच्या खोलीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

मडगाव पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक संजय वेलिप करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलची खोली आतून बंद होती. हॉटेल कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा उघडण्यासाठी बराच वेळ प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पोलिस आणि अग्निशमन विभागाशी संपर्क साधला.

अग्निशमन दलाने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, मुजावर हे बेडवर पडलेले आढळले. त्यानंतर १०८ आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली असता, त्यांनी कबीर यांना मृत घोषित केले.

प्राथमिक तपासात खोलीत संशयास्पद कोणताही पुरावा आढळून आलेला नाही. त्यामुळे ही आत्महत्या आहे की नैसर्गिक मृत्यू, याबाबत अद्याप निश्चित निष्कर्ष काढता आलेला नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण समोर येणार, असं पोलिसांनी सांगितलं.

या घटनेमुळे गांधी मार्केटजवळील परिसरात खळबळ उडाली असून, मुंबईतील व्यक्ती गोव्यात हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कायद्याचा बडगा की केवळ दिखावा? लुथरांच्या सुटकेसाठी 'पहिली चाल' खेळली गेली का? - संपादकीय

SMAT Final 2025: हरियाणा की झारखंड? कोण उंचावणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी? फायनल सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Goa News Live: जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Goa Weather: राज्यात असंतुलित हवामान, आजारात वाढ शक्य; डॉक्टरांकडून काळजी घेण्याचं आवाहन

Vasco Fish Market: प्रतीक्षा संपली! वास्कोतील मासळी मार्केट 29 पासून खुले, सध्याची जागा 28 पर्यंत खाली करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT