Mumbai Goa Vande Bharat Train Dainik Gomantak
गोवा

'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न', ऐन पावसाळ्यात मुंबई गोवा वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात मोठा बदल

आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्यात आली आहे.

Pramod Yadav

Mumbai Goa Vande Bharat Train: मुंबई गोवा मार्गावर सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा मोठा निर्णय केंद्राच्या वतीने घेण्यात आला. तीन जून रोजी उद्धाटन करून 05 जूनपासून वंदे भारत ट्रेन मुंबई गोवा मार्गावर नियमित धावणार अशी घोषणा केली.

मात्र, उद्धाटन होण्यापूर्वी ओडिसा येथे भीषण ट्रेन अपघात झाल्याने वंदे भारत ट्रेनचे उद्धाटन पुढे ढकलण्यात आले. अखेर वीस दिवस उलटल्यानंतर आता 27 जून रोजी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. मात्र, आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर या ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनला मंगळवारी (दि.27) पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवतील. पूर्वी आठवड्यातून सहा दिवस धावणार असे जाहीर केलेल्या या ट्रेनच्या वेळापत्रकात ऐन पावसाळ्यात बदल करण्यात आला आहे.

वंदे भारत ट्रेन आता आठवड्यातून केवळ तीनच दिवस धावणार आहे. मान्सूनमुळे कोकण रेल्वे मार्गावर वेग मार्यादा लागू करण्यात आल्याने ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, 7.50 तासांत पूर्ण होणारा हा प्रवास मान्सून काळात पूर्ण व्हायला दहा तास लागतील.

असे आहे सुधारीत वेळापत्रक (Mumbai Goa Vande Bharat Train Timetable)

मुंबई गोवा वंदे भारत ट्रेन सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी मुंबई येथून सकाळी 5.32 वा. सुटेल आणि दुपारी 3.30 वा. गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकावर दाखल होईल. म्हणजे तब्बल दहा तासांनंतर ट्रेन गोव्यात येईल.

तर, गोव्यातून या ट्रेनचा परतीचा प्रवास दुसऱ्या दिवशी सुरू होईल. म्हणजेच, मंगळवार, गुरूवार आणि शनिवारी मडगाव येथून 12.20 वा. वंदे भारत ट्रेन सुटेल आणि मुंबई येथे रात्री 10.20 वा. पोहोचेल.

सध्या मुंबई गोवा रेल्वे मार्गावर तेजस ही सर्वात वेगवान ट्रेन धावते, तेजस 586 कि.मी अंतर आठ तास आणि 50 मि. पूर्ण करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT