Mumbai Goa Vande Bharat Train Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Vande Bharat Train: आता दररोज धावणार मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस; नवे वेळापत्रक जाहीर

पावसाळा सुरु झाल्यानंतर वेळापत्रकात बदल करुन आठवड्यातील केवळ तीन दिवस वंदे भारत धावत होती.

Pramod Yadav

Mumbai Goa Vande Bharat Train: मुंबई ते गोवा दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे गैर-पावसाळी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वंदे भारत आता शुक्रवार वगळता दररोज धावणार आहे.

पावसाळा सुरु झाल्यानंतर वेळापत्रकात बदल करुन आठवड्यातील केवळ तीन दिवस वंदे भारत धावत होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन महिन्यापूर्वी उद्घाटन झालेल्या मुंबई ते गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वंदे भारतमुळे प्रवासांच्या वेळेची बचत होणार आहे, एक्सप्रेसमुळे मुंबई ते गोवा अंतर आठ तासांत पूर्ण होणार आहे.

पावसाळ्यात एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता, तेव्हापासून ही ट्रेन आठवड्यातील तीन दिवस चालवली जाते. त्यात आता बदल करून सेवा पूर्ववत केली जाणार आहे. एक नोव्हेंबरपासून नवे वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामानिमित्त केवळ शुक्रवारी ही ट्रेन बंद ठेवली जाणार आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव स्टेशनपर्यंत धावणाऱ्या या ट्रेनला आठ डब्बे असून 586 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी केवळ आठ तासांचा वेळ लागतो.

या मार्गावरील अन्य फास्ट रेल्वेपेक्षा हा कालावधी तीन ते चार तासांनी कमी आहे. यामुळे या गाडीला प्रवाशांची पसंती मिळत आहे.

आगामी येणाऱ्या दिवाळीच्या सुट्टया आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रवासी वंदे भारत एक्सप्रेसला पंसती देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हडफडे दुर्घटना; गर्दी आणि लहान दरवाज्यांमुळे लोक अडकले, पळून जाण्यासाठी मार्गच नव्हता; प्राथमिक तपासात धक्कादायक खुलासे

हडफडे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख, तर जखमींना 50 हजारांची आर्थिक मदत; CM प्रमोद सावंतांची घोषणा

Goa Bread History: 1500च्या दशकात पोर्तुगिज आले, भारतात सर्वांत पहिला 'पाव' गोव्यात तयार झाला; इथून तो मुंबईत गेला..

VIDEO: LIVE सामन्यात 'हाय-व्होल्टेज' ड्रामा! बाचाबाचीनंतर संतापलेल्या आर्चरचा बाउन्सर, स्मिथनं थेट षटकार ठोकत दिलं उत्तर

30 कोटी रुपयांची फसवणूक, चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांना अटक; मनोरंजन विश्वात खळबळ!

SCROLL FOR NEXT