Mumbai Goa Vande Bharat Train Update  Dainik Gomantak
गोवा

Mumbai-Goa Vande Bharat Express: अखेर मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला ग्रीन सिग्नल; जाणून घ्या, तारीख आणि वेळापत्रक

ओडिशा येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे उद्घाटन लांबणीवर पडले होते.

Rajat Sawant

Mumbai-Goa Vande Bharat Express: गोवा-मुंबई सेमी-हाय-स्पीड वंदे भारत ट्रेनचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पध्दतीने होणार होते.

मात्र, ओडिशा येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे उद्घाटनाची तारीख पूढे ढकलण्यात आली होती.

दरम्यान, गोवा-मुंबई वंदे भारत ट्रेन कधी सुरू होणार? याची प्रतिक्षा सगळ्यांना लागून राहिली होती. गोवा-मुंबई वंदे भारत ट्रेन 27 जूनपासून सुरु होणार आहे.

गोवा-मुंबई वंदे भारत ट्रेन 27 जूनपासून सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत सुत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जून रोजी एकाच वेळी गोवा-मुंबईसह पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.

वंदे भारतचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते आभासी पध्दतीने होणार आहे. गोवा-मुंबई, बेंगळुरू-हुबळी-धारवाड, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर या पाच वंदे भारत ट्रेन 27 जूनपासून धावणार आहेत.

संभाव्य वेळापत्रक

मुंबईहून सकाळी ५.२५ वाजता सुटेल.

मडगाव स्थानकावर दुपारी १.१५ वा. पोहोचेल.

मडगावहून दुपारी २.३५ वाजता सुटेल.

मुंबईत ‘सीएसटी’वर रात्री १०.२५ वाजता पोहोचेल.

(गोवा-मुंबई वंदे भारत ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावेल, तिची सेवा शुक्रवारी बंद असेल.)

प्रमुख थांबे : दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिवी. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Theft: 1 नाही, 2 नाही.. तब्बल 5 दुकाने फोडली! केरी-सत्तरीत चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिक चिंताग्रस्त

Satyapal Malik: घटनात्मक पदावर असतानाही सरकारविरुद्ध उघडपणे बोलणारे, बेधडक सत्य सांगणारे 'सत्यपाल मलिक'

Palolem Nagarse: कोमुनिदादच्या जागेत घातले कुंपण, जमीन हडपण्याचा प्रयत्न; नगर्से-पाळोळेतील नागरिक संतप्त

Goa: 'कर्ज काढून सण साजरे केले नाहीत', मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर; मतदारसंघासाठी 100 कोटींची तरतूद केल्याची दिली माहिती

Rashi Bhavishya 06 August 2025: तांत्रिक कामे किंवा इलेक्ट्रॉनिक बाबतीत दक्षता घ्या, आरोग्याकडे दुर्लक्ष नको

SCROLL FOR NEXT