अस्सल चोरी केले अन् बनावट ठेवले, दागिने घेऊन सेल्समन झाला फरार; मुंबई-गोव्यात मौज करून संपले पैसे म्हणून...

सेल्समनने मुंबई-गोव्यात जाऊन चोरीचे दागिने विकले आणि हॉटेलमध्ये राहिला.
Indore, Madhya Pradesh Crime Case
Indore, Madhya Pradesh Crime CaseDainik Gomantak
Published on
Updated on

ज्वेलरी शोरूममध्ये काम करणाऱ्या सेल्समनला चोरी करण्याची लालूच लागली, शोरूममधील दागिने चोरून त्याजागी बाजारातून बनावट दागिने आणून तेथे ठेवायचा. शोरूम प्रशासनाला ही बाब कळताच सेल्समनने चोरीचा माल घेऊन इंदूर येथून पळ काढला.

सेल्समनने मुंबई-गोव्यात जाऊन चोरीचे दागिने विकले आणि हॉटेलमध्ये राहिला. जेव्हा पैसे संपले आणि त्याला आपल्या कुटुंबाची आठवण आली तेव्हा तो इंदूरमधील आपल्या घरी परतला. येथे येताच पोलिसांनी त्याला अटक केली. इंदूर, मध्य प्रदेश येथील ही घटना आहे.

आरोपी सेल्समनने दागिने कसे चोरले, किती चोरी केली, तो शोरूममध्ये कधीपासून काम करत होता. याची सविस्तर माहिती जाणून या बातमीतून जाणून घेऊया.

आशिष जाधव असे आरोपीचे नाव आहे. आशिष 6-7 महिन्यांपूर्वी एका ज्वेलरी शोरूममध्ये सेल्समन म्हणून रुजू झाला. आशिष शो केसमधून मूळ दागिने चोरून तेथे त्याच किंमतीचा टॅग लावून बनावट दागिने लावत होता. अशा प्रकारे त्याने 7 सोन्याचे दागिने चोरले.

दागिने चोरी आणि विक्री करताना, दुकानातील इतर सेल्समनना संशय आल्याने, त्याची चौकशी करण्यात आली. आशिष या प्रकरणात सापडला आणि तपासात त्याच्याकडे बनावट दागिने असल्याचे निष्पन्न झाले. शोरूमचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अधिक स्पष्टता आली.

Indore, Madhya Pradesh Crime Case
'मोगा आलाय, आता भिवपाची गरज ना', 'शुभंकर' अनावरण कार्यक्रमात पी. टी. उषा आणि CM सावंत काय म्हणाले?

आशिषने चोरीचे दागिने गोवा, मुंबई आणि मुरादाबाद येथे विकले आणि पैसे घेऊन घेऊन तो त्याच ठिकाणी राहू लागला. हॉटेलमध्ये मुक्काम केला आणि इकडे तिकडे फिरला. गोवा-मुंबईत राहून तो इंदूर येथील आपल्या घरी परतला तेव्हा पोलिसांनी त्याला पकडले.

गुन्हा दाखल झाल्यापासून आशिष फरार होता. अटक केल्यानंतर त्याच्याकडून चोरीच्या 7 सोन्याच्या वस्तूंपैकी 3 जप्त केल्या आहेत. आशिषने महाराष्ट्र आणि गोव्यात 4 वस्तू विकल्या. पोलीस रिमांड घेऊन त्या वस्तू जप्त केल्या जाणार आहेत.

आरोपी आशिष हा शोरूमसमोर मूळ दागिन्यांचे फोटो काढायचा आणि नंतर सराफा दुकानात जाऊन व्यापाऱ्याला तो फोटो दाखवून हुबेहूब इमिटेशन ज्वेलरी बनवायला सांगायचा, त्यानंतर बेंटॅक्सचे बनावट दागिने बनवायचे. तो शोरूममध्ये आणायचा आणि मूळ दागिन्यांच्या जागी बदलून ठेवायचा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com