Mumbai Goa Vande Bharat Train Fare  Dainik Gomantak
गोवा

त्यापेक्षा विमान प्रवास परवडला, मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन सुरू होताच आता तिकीट दरांवरून चर्चा

नुकतेच उद्घाटन झालेल्या वंदे भारत ट्रेनच्या प्रवासासाठी असणारे भाडे सध्या चर्चेचा विषय ठरत

Pramod Yadav

Mumbai Goa Vande Bharat Train: मागील काही दिवसांपासून रखडलेल्या मुंबई - गोवा सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन आज (दि.27 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. गोव्यासाठी ही पहिलीच वंदे भारत ट्रेन असून, यामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.

आधुनिक सुविधा आणि आरामदायी प्रवास यामुळे या ट्रेनची सर्वत्र चर्चा आहे. मात्र, ट्रेनच्या प्रवासासाठी असणारे भाडे सध्या चर्चेचा विषय ठरत असून, त्यापेक्षा विमान प्रवास परवडला अशी प्रतिक्रिया लोकांमधून येत आहे.

मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन आणि विमान प्रवास यांची तुलना

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानक या दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या एसी खूर्चीचे भाडे 1,970 रूपये आहे. तर, एक्सिक्युटिव्ह खूर्चीसाठी 3,535 रूपये मोजावे लागणार आहेत.

Mumbai Goa Flight Fare

त्या तुलनेत मुंबई ते गोवा विमान प्रवासाचे दर ऑनलाईन तपासले असता ते वंदे भारतच्या प्रवासपेक्षा कमी असल्याचे दिसून आले. विमान प्रवासाचे भाडे विविध कंपनीसाठी वेगळे असते शिवाय ते रोज बदलत असते. दरम्यान, आजचा तिकीटदर 1808, 04 जुलैसाठी 1908 रूपये आणि 07 जुलैसाठी 2,572 रूपये दाखवत आहे.

त्यामुळे जास्त पैसे देऊन दहा तास वंदे भारतने प्रवास करायचा की त्यापेक्षा एका तासाचा विमान प्रवास करायचा असा प्रश्न सध्या

पावसाळ्यात प्रवासाचा वेळ वाढणार

कोकण मार्गावर पावासळ्यात ट्रेनसाठी वेग मर्यादा लागू केली जाते. याचा फटका वंदे भारत ट्रेनला देखील बसणार असून, वंदे भारतच्या प्रवासाची वेळ वाढणार आहे. त्यामुळे आठ तासांत पूर्ण होणाऱ्या या प्रवासाला दहा तास लागतील.

वेळापत्रकात देखील बदल

सोमवार, बुधवार व शुक्रवारी मुंबई हून सकाळी 5.32 वाजता ही एक्सप्रेस सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 3.30 वाजता मडगावला पोहोचेल.

मडगावहून परतीचा प्रवास मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी 12.20 वाजता सुरू होईल व मुंबईला रात्री 10.20 वाजता पोहोचेल. सुरूवातीला आठवड्यातील सहा दिवस ही ट्रेन धावणार होती मात्र, आता केवळ तीन दिवस ट्रेन धावणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test: पहिला विजय झाला, आता मालिका विजयाची 'हुकमी तयारी'! दुसरा सामन्याचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर वाचा

Haryana Crime: तोकडे कपडे आणि चारित्र्यावर संशय... 18 वर्षीय भावाने बहिणीची बॅटने मारहाण करुन केली हत्या; हरियाणातील संतापजनक घटना!

Formula 4 Racing In Goa: गोव्यात होणार प्रतिष्ठीत 'फॉर्म्युला- 4 रेस'; गोमंतकीयांना अनुभवता येणार जागतिक रेसिंग स्पर्धेचा थरार

टीसींना 'बॉडी कॅमेऱ्यांचे' कवच! खोट्या विनयभंगाचे आरोप रोखण्यासाठी होतेय मागणी, तिकीट नसताना टीसीशी हुज्जत घालणाऱ्या महिलेचा Video Viral

Goa Congress: 'भाजप का काँग्रेसविरोधात लढायचंय ठरवा'; भूमिका स्पष्ट करण्याचा माणिकराव ठाकरेंचा 'आप'ला सल्ला

SCROLL FOR NEXT