Mumbai Goa Highway Parshuram Ghat Update Dainik Gomantak
गोवा

मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, परशुराम घाटाबाबत मंत्र्यांनी दिली अपडेट

मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाबाबत महत्वाची अपडेट प्रवाशांसाठी दिली आहे.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway Parshuram Ghat Update: उन्हाळी सुट्यांचे दिवस सुरू असून, गावाकडे सुट्टी घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी सध्या कोकणात दाखल होत आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मुंबई-गोवा महामार्गावर कधी वाहतूक कोंडी तर, परशुराम घाटात दरड कोसळल्यामुळे प्रवशांची गैरसोय झाली. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाबाबत महत्वाची अपडेट प्रवशांसाठी दिली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी परशुराम घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ट्विट माहिती दिली आहे.

काय म्हणाले रविंद्र चव्हाण ?

गेल्या 16 दिवासांपासून ठराविक वेळेसाठीच सुरू असणारा मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट सर्व वाहनांसाठी 24 खुला करण्यात आला आहे. घाटावरील चौपदरीकरणाचे काम जवळपास 40 टक्के पूर्ण झाले आहे. या घाटावरून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनी आणि वाहन चालकांनी याची नोंद घ्यावी.

मंगळवारी परशुराम घाटात कोसळली होती दरड

मंगळवारी रत्नागिरीत मोठा पाऊस पडल्याने परशुराम घाटात दरड कोसळून रस्त्यावर चिखल आला होता. त्यामुळे या मार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली. त्यादिवशी मुंबई-गोवा महार्गावर सकाळी पाच वाजल्यापासून वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या व प्रवाशांना ताटकळत थांबावे लागले. शेकडो वाहने अडकून पडल्याने वाहतूक चिरणे मार्गे वळवण्यात आली.

त्याचदिवशी महाड येथे कोळशाचा ट्रक आणि एसटी बसचा झाला अपघात

दरम्यान, याचदिवशी मुंबई-गोवा महामार्गावर महाड शहरानजीक ट्रक आणि बसचा अपघात झाला, यात सात प्रवासी जखमी झाले. महाड शहरानजीक नाते खिंड येथे हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी महाडच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT