Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, जाणून घ्या आजचे भाव

गेल्या एक वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल मागील वर्षी 22 मे रोजी झाला होता.
Goa Petrol-Diesel Price
Goa Petrol-Diesel Price Dainik Gomantak

Goa Petrol-Diesel Price: देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने अपडेट होत असतात. देशातील तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात. 12 मे साठी पेट्रोल आणि डिझेलचे दरही अपडेट करण्यात आले आहेत. ताज्या यादीनुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

गेल्या एक वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल मागील वर्षी 22 मे रोजी झाला होता.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 98.08

Panjim ₹ 98.08

South Goa ₹ 97.22

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.62

Panjim ₹ 90.62

South Goa ₹ 89.79

Goa Petrol-Diesel Price
Vande Bharat: 130 किमी स्पीड, 6 तासात 520 किमी; 'या' मार्गावर धावणार देशातील 17वी वंदे भारत एक्सप्रेस!

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com