Raj Thackeray On Goa-Mumbai expressway Dainik Gomantak
गोवा

मुंबई- गोवा खड्ड्यांचा हायवे; महाराष्ट्रात राजकारण तापले, मनसेनं कंपनीचं कार्यालय फोडलं

राज ठाकरेच्या मेळाव्यानंतर मनसैनिक आक्रमक

Pramod Yadav

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेविरुद्धच्या आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पनवेल येथे झालेल्या सभेत हिरवा झेंडा दाखवला. सर्वसामान्य लोकांना त्रास होईल असं नको पण आंदोलन असं करा कि सरकारला धडकी भरली पाहिजे.

पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं काम वेळेत व्हावं ह्यासाठी पक्ष म्हणून ताकदीने रस्त्यावर उतरा. असे आवाहन राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना केले.

राज ठाकरे यांच्या आंदोलनाला झेंडा दाखवल्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले असून, मुंबई-गोवा महामार्गाचे काम केलेल्या कंपनीचे कार्यालय मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडलं आहे.

मनसेच्या मनसैनिकांनी माणगावमधील बांधकाम कंपनीचं कार्यालय फोडलं आहे. अशी माहिती समोर आलीय.

मुंबई गोवा महामार्गावर आत्तापर्यंत खर्च झालेला पैसा १५,६६६/- कोटी रुपये आहे. तरीही रस्ता झाला नाही. फक्त काहींच्या तुंबड्या भरल्या गेल्या. असा आरोप राज ठाकरेंनी या सभेतून केला.

मुंबई गोवा महामार्गावर आजपर्यंत २५०० लोकं मृत्युमुखी पडलेत. अनेकांना दुखणी लागली आहेत, गाड्यांचं नुकसान झालं आहे.

मी नितीनजींना विनंती केली होती की तुम्ही वैयक्तिक लक्ष घाला तर ते म्हणाले की अहो कॉन्ट्रॅक्टर पळून जातात. हे नेमकं मुंबई गोवा हायवेच्या बाबतीतच का घडलं? कोकणाचा विकास होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करतंय का? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी सभेतून उपस्थित केला.

मुंबई-गोवा हायवेचं काम 2007 ला सुरु झालं, त्यानंतर इतकी सरकारं आली पण रस्त्याचं काम झालंच नाही आणि तरीही त्याच लोकांना निवडून कसं दिलं जातं? रस्ते खड्ड्यात गेले काय आणि आपण खड्ड्यात गेलो काय आपल्या मतदारांना काहीच वाटत नाही? अशा शब्दात राज ठाकरे यांनी टीका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fraud Case: बनावट 'आयपीओ'चे आमिष; ज्येष्ठाची 4 कोटींची फसवणूक, कोल्हापूर येथून संशयिताला अटक

पैसे परत न केल्यास FIR! वादग्रस्त 'कामसूत्र अँड ख्रिसमस' कार्यक्रमावर क्राईम ब्रँचची मोठी कारवाई

Goa Politics: काँग्रेस युतीस तयार; जागांबाबत विजय, मनोजशी लवकरच चर्चा; गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांची माहिती

T20 World Cup 2026 मध्ये भारत-पाकिस्तान भिडणार, कधी आणि कुठे होणार हाय-व्होल्टेज सामना? मोठी अपडेट आली समोर

Goa Live News:चावडी-काणकोणमध्ये ज्वेलरी दुकानात चोरीचा प्रयत्न; पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर दगडफेक!

SCROLL FOR NEXT