Kashedi Tunnel On Mumbai - Goa Highway Dainik Gomantak
गोवा

Mumbai - Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट, मुख्य बोगदा १५ दिवस राहणार बंद

Mumbai - Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा तब्बल १५ दिवस बंद ठेवला जाणार आहे.

Pramod Yadav

Mumbai - Goa Highway Kashedi Tunnel

पणजी: मुंबई - गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महामार्गावरील कशेडी बोगदा तब्बल १५ बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई - गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना आता कशेडी घाट मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोगद्याकडे जाणाऱ्या पुलाचे गर्डर बाजूला करण्याचे काम सध्या या ठिकाणी सुरू असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांना त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. वाहनांना होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन बोगदा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी देखील अनेकवेळा विविध कामाच्या निमित्ताने हा बोगदा बंद ठेवण्यात आला होता. वारंवार बोगदा बंद ठेवला जात असल्याने प्रवशांनी संताप व्यक्त केला आहे.

कशेडी घाटाला पर्याय म्हणून या बोगद्याची निर्मिती करण्यात आली आहे. पण, आता कामानिमित्त बोगदा बंद ठेवल्याने आता प्रवाशांना पर्यायी कशेडी घाटाचा वापर करावा लागणार आहे. रविवारपासूनच (२४ नोव्हेंबर) या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. गर्डर बाजुला करण्याचा कामात संभाव्य धोका लक्षात घेऊन बोगदा बंद ठेवण्याची अल्याची माहिती अभियंत्याने दिली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी गेल्या काही महिन्यापूर्वी कशेडी बोगद्याचे उद्घान करुन तो वाहतुकीसाठी खुला केला होता. दरम्यान, विविध कामाच्या निमित्ताने तो वांरवार बंद ठेवला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT