Bhopal Goa Flight: भोपाळ ते गोवा थेट विमानसेवा! पहिल्यांदाच 180 आसनी क्षमतेचे बोईंग प्रवाशांच्या सेवेत

Bhopal Goa Flight: बऱ्याच कालावधीनंतर भोपाळ ते गोवा थेट विमानसेवा मिळणार आहे. भोज विमानतळावरुन १८० आसनी विमान उड्डाण करणार आहे.
Flight Bomb Threat: विमान हवेत असतानाच मिळाली बॉम्ब धमकी; गोव्यातून कोलकताला जाणाऱ्या फ्लाईटचे हैदराबादमध्ये इमर्जन्सी लॅडिंग
Goa FlightDainik Gomantak
Published on
Updated on

Bhopal Goa Flight

मडगाव: भारतातील फ्लाइट्सचे हिवाळी वेळापत्रक लागू झाले आहे. नव्याने लागू करण्यात आलेल्या वेळापत्रकात अनेक बदल करण्यात आले आहेत. भोपाळला यामुळे अनेक अतिरिक्त उड्डाणे मिळाली आहेत. भोपाळहून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांना आता थेट विमानसेवा मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळ येथील राजा भोज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडिया आणि इंडिगोची अनेक नवीन उड्डाणांचा हिवाळ्याच्या वेळापत्रकात समावेश करण्यात आला आहे. बऱ्याच कालावधीनंतर भोपाळ ते गोवा थेट विमानसेवा मिळणार आहे. भोज विमानतळावरुन १८० आसनी विमान उड्डाण करणार आहे.

Flight Bomb Threat: विमान हवेत असतानाच मिळाली बॉम्ब धमकी; गोव्यातून कोलकताला जाणाऱ्या फ्लाईटचे हैदराबादमध्ये इमर्जन्सी लॅडिंग
धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

भोपाळ ते गोवा विमानाचे वेळापत्रक (Bhopal Goa Flight Timetable)

१ डिसेंबरपासून सुरू होणारी ही विमानसेवा शनिवार वगळता ६ दिवस चालणार आहे. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन त्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. राजा भोज येथून दुपारी ३.२० वाजता आणि गोव्याहून दुपारी १ वाजता उड्डाण असेल.

भोपाळ ते गोवा थेट विमान इंडिगोने सुरू केले होते. इंडिगोने मे २०२३ मध्ये पहिल्यांदा थेट उड्डाणे सुरू केली. आता १८० आसनी बोईंग विमान चालवण्यात येणार आहे. भोपाळ ते गोवा हे अंतर १ तास ५० मिनिटांत कापले जाईल.

प्रवासभाडे (Ticket Rate/ Fare)

भोपाळ ते गोवा दरम्यान चालणारे विमान भोपाळच्या राज भोज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरेल. यासाठी सुरुवातीचे भाडे 5000-5500 रुपये निश्चित करण्यात आले आहे. एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसने यासाठी तयारी सुरू केली आहे.

Flight Bomb Threat: विमान हवेत असतानाच मिळाली बॉम्ब धमकी; गोव्यातून कोलकताला जाणाऱ्या फ्लाईटचे हैदराबादमध्ये इमर्जन्सी लॅडिंग
Goa Cabinet: दोन दिवसांत गोवा मंत्रीमंडळात फेरबदल? मुख्यमंत्री सावंतांची दिल्लीत खलबंत, मंत्री-नेत्यांशी भेटीगाठी

हिवाळा सुरू झाल्यावर, लोक त्यांच्या सुट्टी घालवण्यासाठी उबदार ठिकाणी जाण्याचा विचार करतात. गोवा हे भारतातील एक राज्य आहे जिथे पर्यटकांना भेट द्यायला आवडते. अनेक वेळा वेळेवर गाड्या न मिळाल्याने लोकांना त्यांचे प्लॅन रद्द करावे लागतात. मात्र, आता भोपाळ येथून सुरु झालेल्या थेट विमानसेवेमुळे गोव्याला जाण्यासाठी फार विचार करावा लागणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com