Mumbai-Goa Highway Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway: शनिवारी बंद झालेला मार्ग रविवारी सुरु झाला, मुंबई - गोवा महामार्गावर भूस्खलन

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग सरकाचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway

पावसाळा सुरु झाल्यानंतर मुंबई - गोवा महामार्गावर भूस्खलन, रस्ता खचणे किंवा खड्डे निर्माण होण्याची समस्या उद्भवत असते. शनिवारी सायंकाळी भूस्खलनामुळे बंद झालेला मुंबई - गोवा महामार्ग बारा तासानंतर रविवारी सकाळी सुरु झाला. बारा तास या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. रायगड जिल्ह्यातील महाड येथे भूस्खलन झाल्याची घटना समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.08) सायंकाळी सहा वाजता महाड येथे भूस्खलन झाले. सततच्या मुसळधार पावासामुळे महामार्गाशेजारील भूसभुशीत झालेली माती महामार्गावर आली. यामुळे मार्ग बंद झाला.

मातीचा ढीग बाजुला करेपर्यंत महामार्ग बंद ठेवण्यात आला. सुमारे बारा तास हा मार्ग बंद होता. अखेर बारा तासानंतर रविवारी (दि.09) सकाळी महामार्ग पुन्हा वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला.

या काळात महामार्गावर अनेक किलोमीटर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

अनेक वाहने गोव्याच्या दिशेने जात होती तर अनेकजण कोकणात गावी किंवा पर्यटनासाठी जात होते. महाड येथील भूस्खलनामुळे महामार्गावरील प्रवाशांना याचा फटका बसला.

वाहतूक बंद झाल्यानंतर अनेकांनी सोशल मिडियावर याबाबत तक्रार केली. मुंबई - गोवा महामार्ग सरकारचा फसलेला प्रकल्प आहे. तसेच, महामार्ग पूर्णपणे सुरक्षित आणि सुरळीत करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप देखील अनेक नेटकऱ्यांनी सोशल मिडियाद्वारे केला.

समोर आलेल्या माहितीनुसार, या काळात वाहतूक गोव्याकडे जाणाऱ्या कॅरेजवेवरून मुंबईकडे जाणाऱ्या कॅरेजवेकडे वळवण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT