Mumbai Goa Highway Accident Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway Accident: उभ्या कंटेनरला दुचाकीची धडक, कणकवली येथील दोन तरुणांचा मृत्यू

Mumbai Goa Highway: दोघे कणकवलीहून ओरोस च्या दिशेने जात असताना हा अपघात घडला.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway Accident

कणकवली: मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात कणकवली येथील दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर हॉटेल मालवणी जवळ मध्यरात्री अडीच वाजता हा अपघात झाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला.

संकेत नरेंद्र सावंत (वय २४, परबवाडी, कणकवली) व विद्यानगर येथील साहिल संतोष भगत (वय २३, विद्यानगर, कणकवली) असे या अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई - गोवा महामार्गावर वागदे येथील हॉटेल मालवणी जवळ महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीने धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तरुण संकेत आणि साहिल यांचा मृत्यू झाला आहे. दोघे कणकवलीहून ओरोस च्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi UAE Visit 2026: "होर्मुजची कोंडी फुटणे ही आमची प्राथमिकता'' पीएम मोदींचा युएईच्या भूमीवरुन जगाला शांततेचा संदेश

Viral Video: "मीच खरा मोगली" म्हणत पठ्ठ्याचा सापाशी पंगा, डंक मारताच हुसेन बोल्टसारखा सुस्साट; नेटकरी म्हणाले, 'एका झटक्यातच जिरली'

उघड्यावर कचरा टाकल्यास 5 हजारांचा दंड, नास्नोळा पंचायत मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; जागरूक नागरिकांना 10 हजारांचे बक्षीस

Ketu Gochar 2026: केतुने बदलली चाल अन् 3 राशींच्या नशीबाने घेतला 'यू-टर्न'! ऑफिसमधील कामाचे क्रेडिट चमच्यांना मिळणार; करिअरची गाडीही पंक्चर होणार

Usgao Water Issue: उसगावात दूषित पाणीपुरवठा, दोन दिवसांत उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT