Nitin Gadkari Gomantak Digita team
गोवा

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबरअखेरीस पूर्ण

गडकरी : गोव्यासाठी रिंगरोडला मान्यता

गोमन्तक डिजिटल टीम

Nitin Gadkari on Mumbai Goa Highway: गोवा आणि कोकण भागासाठी मोठी खूशखबर आहे. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (एनएच-६६) बांधकाम यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल आणि जानेवारी २०२४ मध्ये हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, आम्ही गोव्यात सुमारे १५ हजार कोटी रुपयांची रस्त्यांची कामे पूर्ण केली आहेत.

हल्लीच उद्‍घाटन झालेला नवीन झुवारी पूल हे त्याचे उदाहरण आहे. तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गोव्यासाठी रिंग रोड प्रकल्पासाठी डीपीआर मंजूर केला आहे.

मुंबई-गोवा प्रवास साडेचार तासांत

गडकरी यांनी हवाई सर्वेक्षणाद्वारे मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. कोणत्याही परिस्थितीत या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण केले जाणार आहे.

एकदा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई - गोवा हा प्रवास अवघ्या साडेचार तासांत करता येईल. या महामार्गासाठी १५५६६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

आपले मंत्रालय वाहतुकीला अडथळा आणणारे टोल नाके न ठेवता महामार्गांवर उपग्रह आधारित भाडे संकलन सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पर्यटन आणि दळणवळणाच्या उद्देशाने लांब समुद्रकिनारा लाभलेल्या कोकण प्रदेशासाठी सी प्लेन, हॉवरक्राफ्ट आणि वॉटर टॅक्सी सिस्टमच्या व्यवहार्यतेचा अभ्यास केला पाहिजे.

नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Gang War: मुंगूल गँगवॉरप्रकरणी 10 आरोपींना जामीन मिळणार की नाही? 12 डिसेंबरला कोर्टाचा फैसला; साक्षीदारांना धमकावण्याची भीती

Goa Nightclub Fire: क्लब जळून खाक, मालक विदेशात फरार! पळपुड्या मालकांसाठी गोवा पोलिसांकडून 'लुक आऊट' नोटीस जारी; इंटरपोलची घेणार मदत

गोमंतकीय भाविकांसाठी खुशखबर! गोव्याहून शिर्डी-तिरुपतीसाठी सुरु होणार विमानसेवा; खासदार तानावडेंनी केली खास मागणी

Delhi Blast: प्रेमात धोका, एक्स-बॉयफ्रेंडकडून बदला! दिल्ली ब्लास्ट आणि 'डॉक्टरांच्या' कटाच्या पर्दाफाशाचा ओमर अब्दुल्लांनी केला खुलासा

Wild Boar Attack: बेंदुर्डे येथे रानडुकराच्या हल्ल्यात 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, काजू बागायतीत गेला होता सफाईसाठी

SCROLL FOR NEXT