Amit Palekar: आम आदमी पक्षाची गोव्यात 'मोदी हटाओ, देश बचाओ' पोस्टर मोहिम

प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांची माहिती; राज्यभरात लावणार पोस्टर्स
Amit Palekar
Amit PalekarDainik Gomantak
Published on
Updated on

Amit Palekar: दिल्लीत पंतप्रधान मोदींविरोधात पोस्टर्स लावल्यावरून अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही हुकुमशाही असून विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे गोव्यात राज्यभर पंतप्रधान मोदींविरोधात पोस्टर्स मोहिम राबवणार आहे, अशी माहिती आम आदमी पक्षाच्या वतीने देण्यात आली.

Amit Palekar
Verna Crime: वेर्णा येथे परप्रांतीयाकडून एकावर चाकू हल्ला; पळून जाण्याच्या तयारीत असताना रेल्वेस्थानकावर अटक

आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर म्हणाले की, देशातील सरकार हे हिटलरपेक्षा वाईट आहे. कालच्या बजेटमधूनही नागरिकांना लॉलीपॉप दाखवले आहे. गत बजेटमधील ६५ टक्के घोषणा अपूर्ण आहेत. त्याच घोषणा यंदा पुन्हा केल्या आहेत.

गोव्यातील कुठल्याही मध्यमवर्गीयााल विचारा तो सुखी आहे का? गॅस सिलिंडरचे दरात झालेली वाढ पाहा. महागाई प्रचंड वाढत चालली आहे. सर्वसामान्यांनी कसं जगायचं? राज्य सरकारने सादर केलेल्या बजेटमुळे कुणाला आनंद झाला आहे का हे पाहा.

Amit Palekar
Goa Land Grab Issue: गोव्यातील जमिन हडप अपहाराची पाळेमुळे सिंधुदुर्गात?

आपचे प्रदेश उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक म्हणाले, देशभरात मोदी सरकारविरोधात कुणी बोलू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. पण लोकांनी हे लक्षात ठेवावे, मोदी जोपर्यंत पंतप्रधान आहेत तोपर्यंत देशाचे भले होणार नाही. त्यामुळे मोदींना हटविले पाहिजे. तरच देश वाचेल. मोदींविरोधात पोस्टर लावल्यावरून राजधानी दिल्लीत १३८ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

त्यामुळे आम्ही राज्यात मोदी हटाओ, अशी पोस्टर्स मोहिम राबवत आहोत. आम्ही सर्व गोवेकरांनाही हे आवाहन करत आहोत की, स्वातंत्र्यसैनिकांना ज्यासाठी बलिदान दिले, त्या लोकशाहीला वाचविण्यासाठी गोवेकरांनीही आमच्या या मोहिमेत आम्हाला सहकार्य करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com