Bulbul Film Festival Maragao Dainik Gomantak
गोवा

Bulbul Film Festival: 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' सिनेमाने उघडणार बालचित्रपट महोत्सवाचा पडदा; 32 देशांतील चित्रपटांची मेजवानी

Bulbul International Film Festival: मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या मराठी चित्रपटाने यंदाच्या दुसऱ्या बुलबूल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ होईल.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या मराठी चित्रपटाने यंदाच्या दुसऱ्या बुलबूल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ होईल. तत्पूर्वी चित्रपट महोत्सवाचे उद्‍घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मडगावचे आमदार दिगंबर कामत व भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा चित्रपट निर्माते दामोदर नाईक यांच्या उपस्थितीत होणार आहे. हा चित्रपट महोत्सव सोमवार १७ ते २१ फेब्रुवारी असे पाच दिवस मडगावच्या रवींद्र भवनात आयोजित करण्यात आला आहे.

२१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महोत्सवाच्या समारोप सोहळ्यास कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट चित्रपट, लघुपट व कलाकारांना पारितोषिके वितरित केली जातील. आजच्या पत्रकार परिषदेला आमदार दिगंबर कामत, माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर, शिक्षण खात्याच्या उपसंचालिका सिंधू प्रभू तसेच महोत्सवाचे संचालक बिपीन खेडेकर व सिद्धेश नाईक उपस्थित होते.

या चित्रपट महोत्सवात गोव्यातील तसेच कणकवली, कारवार, सदाशिवगड यासारख्या शेजारील राज्यातील गावांतून हजारो विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच महोत्सवांतर्गत आयोजित विविध स्पर्धा, कार्यशाळांमध्ये भाग घेणार आहेत.

यंदा देशी व आंतरराष्ट्रीय क्रिडापट्टूंवरील चित्रपट हे या महोत्सवाचे खास आकर्षण असेल. तसेच १८ रोजी संध्याकाळी ६ वाजता आयोजित केलेला मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लगाटे या प्रसिद्ध गायकांचा गायनाचा कार्यक्रम हेसुद्धा महोत्सवाचे आकर्षण असणार आहे. या कार्यक्रमातून मुग्धा व प्रथमेशच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंतच्या गायनातील वाटचालीचा आढावा घेतला जाईल, जो मुलांसाठी स्फूर्तिदायक ठरणार आहे, असेही या वेळी सांगण्यात आले.

या महोत्सवातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाला ‘सुवर्ण बुलबूल चषक’ व ३ लाख रुपये दिले जाणार आहेत. तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाला ‘रौप्य बुलबूल चषक’ व १ लाख रुपये देण्यात येतील. तसेच सर्वोत्कृष्ट लघुपटाला ‘सुवर्ण बुलबूल चषक’ व रोख एक लाख रुपये, तर दिग्दर्शकाला ‘रौप्य बुलबूल चषक’ व ५० हजार रुपये देण्यात येतील.

३२ देशांतील ६६ चित्रपटांची मेजवानी

यंदा महोत्सवात भारत, जपान, तैवान, नॉर्वे, हॉलंड, डेन्मार्क, कोरिया व इतर मिळून ३२ देशांतील ६६ बाल चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. त्यातील १० चित्रपट स्पर्धेसाठी निवडले जातील. तसेच २५ लघुपट प्रदर्शित केले जातील. ‘खारवण’ हा कोकणी चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: पर्यटक महिलेची बेफिकिरी नडली, दारूच्या नशेत गाडी ठोकून 'ती' फरार; स्कुटरस्वार गंभीर जखमी

Viral Video: 'एक्सप्रेस'वे वर थरार! नव्या कारच्या सेलिब्रेशनचा जीवघेणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, तुम्ही पाहिलाय का?

Navi Mumbai Airport: नवी मुंबईला मिळाली जागतिक ओळख, नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; पाहा खास Photos Videos

लेट नाईट ऑपरेशन! कोलवा येथे मसाज पार्लरमधून नऊ मुलींची सुटका; पोलिस, अर्ज यांची संयुक्त कारवाई

GDS Recruitment: 'कोकणी भाषा येते?' गोंयकारांसाठी उघडलंय रोजगाराचं दार, पोस्टात काम करण्याची संधी; वाचा माहिती

SCROLL FOR NEXT