
Indian Science Film Festival 2025
दहावा भारताचा विज्ञान सिनेमा महोत्सव २९ जानेवारी रोजी गोव्यात सुरू होत आहे. दरवर्षी सुमारे ६००० मुले या महोत्सवात सामील होत असतात. यंदाचा महोत्सव जैवविविधतेचे पितामह म्हणून ओळखले जाणारे शास्त्रज्ञ कै. डॉ. एम. एस स्वामीनाथन यांना समर्पित असणार आहे.
मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा या हेतूने हा महोत्सव आम्ही आयोजित करत असतो. या महोत्सवात नेहमीप्रमाणे देशातील अग्रगणी शास्त्रज्ञ मुलांशी संवाद साधण्यासाठी हजर असतील. केवळ सिनेमा दाखवून प्रेक्षकांशी संवाद व्हावा इतक्याच पुरता या महोत्सवाचा हेतू नाही. महोत्सवाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील विज्ञानाच्या अंगाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा या दृष्टीनेही कार्यशाळा आणि इतर कार्यक्रम आखले गेले आहेत.
विज्ञान सिनेमा निर्मिती कार्यशाळेमध्ये विज्ञान आणि सिनेमा निर्मिती यांची सांगड घालून, त्या दृष्टीने सिनेमा निर्मिती व्हावी याचा पाया रचण्याचा प्रयत्न होणार आहे. ज्याप्रकारे परदेशात विज्ञानावर आधारित सिनेमा बनतो तसा भारतात फारसा बनत नाही ही बाब लक्षात घेऊन या कार्यशाळेत काम होणार आहे.
अर्थात त्यासाठी सिनेमा निर्मितीमध्ये रस असणाऱ्या मुलांना विज्ञानातही रस असणे आवश्यक आहे. या कार्यशाळेत पंधरा वर्षांवरील कुणीही प्रवेश घेऊ शकतो. सिनेमा हे माध्यम लोकांना आकर्षित करणारे माध्यम आहे. 'मिशन मंगल' किंवा 'परमाणु' यासारख्या चित्रपटांनी विज्ञान, वैज्ञानिक, वैज्ञानिकांचे कष्ट या संबंधात लोकांना माहिती करून दिली. त्यातून मुलांना प्रेरणाही मिळत असते. 'इन्स्पायर सायन्स थ्रू फिल्म्स' (सिनेमांद्वारे विज्ञान प्रेरणा) हे या महोत्सवाचे घोषवाक्यच आहे.
मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञान या विषयात रस निर्माण होणे सोपे नसते. परंतु विज्ञानाचा अशाप्रकारचा 'महोत्सव' एक प्रकारे मुलांमध्ये विज्ञानाबद्दल जिज्ञासा आणि आवड निर्माण करू शकतो. अशा महोत्सवांना विद्यार्थ्यांची हजेरी असतेच परंतु त्याशिवाय त्यांच्या पालकांनी व इतर लोकांनीही आवर्जून हजेरी लावायला हवी. कारण या महोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या वैज्ञानिक 'एक्स्पो'मधून देखील अनेक वैज्ञानिक उलाढालींची तसेच नवीन शोधांची माहिती मिळत असते, जी त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची ठरू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.