Mud around the tourism department building  
गोवा

पर्यटन खात्याच्या इमारतीजवळील चिखलाचा नागरिकांना त्रास

गोमंतक वृत्तसंस्था

पणजी: पाटो येथील पर्यटन भवनासमोर पर्यटन खात्याच्यावतीने परिषद सभागृहाची उभारणी केली जात आहे. परंतु ज्या कंत्राटदाराद्वारे हे काम केले जात आहे, त्याच्याकडून येथे आवश्‍यक ते उपाय होत नसल्याचे दिसत आहे. कारण या ठिकाणावरून खोदकाम करताना काढला जाणारा चिखल अर्ध्या रस्त्यावर येत असून या मार्गाने ये-जा करणाऱ्या दुचाकीचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुपारनंतर सुकलेल्या मातीच्या धुळीचाही त्रास ये-जा करणाऱ्यांना होत आहे. 

रुअ दी ओरेंम खाडीच्या लगत अगदी पर्यटन खात्याच्या समोरच असलेल्या जागेत पर्यटन खात्याच्यावतीने परिषद सभागृहाची इमारत उभारण्याचे काम सुरू झाले आहे. जागेच्या भोवताली पत्र्याचे कुंपन असले, तरी त्या ठिकाणाहून जी चिखल माती डंपरमधून बाहेर काढली जाते, तेव्हा तेथील माती वाहनांच्या चाकांबरोबरोबर रस्त्यांवर येते. त्यामुळे सकाळच्या सत्रात या ठिकाणचा रस्ता चिखलमय होऊन जात आहे. विशेषतः काही वाहनधारकांनी याविषयी संबंधितांकडे तक्रारीही केल्या, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. चिखल घेऊन गेल्यानंतर रसत्यावर पडणारा किंवा चाकांमुळे येणारा चिखल बाजूला करणे गरचे आहे, पण तसे येथे होताना दिसत नाही.

ज्या ठिकाणी इमारत उभारली जात आहे, ती जागा पाणस्थळ आहे. त्यामुळे याठिकाणची माती सतत ओली राहते. जे खोदकाम सुरू आहे, ते पिलर उभारण्यासाठी असून, अद्याप इतर कामांसाठीही येथील माती मोठ्या प्रमाणात हटविली जाणार आहे. यावरून कंत्राटदाराने वाहन गेल्यानंतर चाकाबरोबर येणारा रस्त्यावरील चिखल तत्काळ हटविण्यासाठी यंत्रणा कामाला लावणे अपेक्षित आ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT