MRF Recruitment Dainik Gomantak
गोवा

MRF Recruitment: नोकरभरती वादावर अखेर पडदा! 'एमआरएफ' कडून गोमंतकीय तरुणांना प्राधान्य; फर्मागुढीत मुलाखतींचं आयोजन

Goa MRF Recruitment: एमआरएफ लिमिटेड या कंपनीने तांत्रिक क्षेत्रातील अडिचशे कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी या मुलाखती घेतल्या.

Manish Jadhav

फोंडा: टायर उत्पादन क्षेत्रात असलेल्या एमआरएफ लिमिटेड या कंपनीने सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील कुडाळ येथील नियोजित मुलाखत केंद्र रद्द करुन शुक्रवारी (12 सप्टेंबर) अखेर फर्मागुढी फोंडा येथील आयटीआय कॅम्पसमध्ये मुलाखती घेतल्या आणि वादावर पडदा पडला. अॅप्रेंटिसशिपसाठी या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले.

दरम्यान, एमआरएफ लिमिटेड या कंपनीने तांत्रिक क्षेत्रातील अडिचशे कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी या मुलाखती घेतल्या. त्यात आयटीआय क्षेत्रातील अनेक युवकांनी या मुलाखतीसाठी उपस्थिती लावली. या सर्व उमेदवारांत गोमंतकीयांचा समावेश होता. सकाळी साडे दहा ते दुपारी एक पर्यंत या मुलाखती घेण्यात आल्या. एमआरएफ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या मुलाखती घेतल्या त्यावेळी आयटीआयचे अधिकारी उपस्थित होते.

'एमआरएफ' कंपनीचा 'आयटीआय'शी करार असून त्यानुसार या मुलाखती वेळोवेळी घेतल्या जातात अशी माहिती देताना यापूर्वीही कशा मुलाखती घेतल्या असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 'एमआरएफ' ने गोमंतकीय युवकांना संधी देण्यासाठी पुढाकार घेतल्याने 'आयटीआय'च्या प्रशिक्षणार्थीना ती एक चांगली संधी मिळाली आहे.

एमआरएफ आणि गोवा (Goa) सरकारच्या 'आयटीआय' मध्ये करार असून त्यानुसारच या मुलाखती घेतल्या जात आहेत. रोजगार संधीमुळे 'आयटीआय' मध्ये शिकण्यासाठी येणाऱ्यांची संख्या त्यामुळे वाढते.

दुसरीकडे, एमआरएफ कंपनीने स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेऊन एक चांगला संदेश दिलाय. यामुळे 'स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी' या मागणीला बळ मिळाले. अशा मोठ्या कंपन्यांनी स्थानिक तरुणांच्या कौशल्य विकासासाठी पुढे येणे आणि त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देणे, हे कोणत्याही राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचे असते. यामुळे स्थानिक तरुणांमधील बेरोजगारी (Unemployment) कमी होण्यास मदत होते आणि तरुणांना आपल्या राज्यातच रोजगार मिळण्याची आशा निर्माण होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: रक्ताच्या नात्यात रक्ताचा सडा! उसन्या पैशांच्या वादातून मेहुण्यानं मेहुण्याचाच काढला काटा; अलिगढमध्ये सुडाचं रक्तरंजित नाट्य

US Iran War: ''युरेनियम कोणालाही सोपवणार नाही'', इराण-अमेरिका संघर्ष विकोपाला; ट्रम्पच्या दाव्याला सुरुंग

PM Modi: पंतप्रधान मोदी देशाला करणार संबोधित! महिला आरक्षण विधेयक रद्द झाल्यानंतर घेणार मोठी भूमिका?

DA Hike: मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ; निवृत्तीवेतनधारकांनाही मिळणार मोठा लाभ

US Iran War: "आमच्या अटी मान्य करा तरच मार्ग खुला" इराणचा टायगर अवतार! व्हिडिओ शेअर करत अमेरिकेला दिलं खुलं आव्हान VIDEO

SCROLL FOR NEXT