Tree Cutting  Dainik Gomantak
गोवा

Malkarnem Manganese Mine : मँगनीज खाणीसाठी हालचाल; जंगलावर कुऱ्हाड ! मळकर्णेतील प्रकार

‘युनायटेड गोवन्स फाऊंडेशन’ची खाण खाते, वनपाल, प्रदूषण नियंत्रणकडे तक्रार

दैनिक गोमन्तक डिजिटल

गेली दहा वर्षे बंद असलेली मॅंगनीज खाण या भागातील सुपीक डोंगरावर पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, स्थानिक पंचायतीला अंधारात ठेवून बेकायदा रस्ता तयार केला जात असल्याने स्थानिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. मळकर्णे गावातील सर्वे क्र. 106/1 या जागेत ही खाण पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींबाबत विविध विभागात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

२०२१ च्या प्रादेशिक आराखड्यात या भागात नैसर्गिक झाडी असल्याची नोंद आहे. ही मालमत्ता १/७८ च्या एका विस्तृत खाण भागाचा हिस्सा आहे. तेथे बेकायदेशीरपणे रस्ता तयार केला जात असून, डोंगर छाटला जाईल, त्यामुळे या परिसरातील शेतीला होणारा पाणीपुरवठा बंद होऊ शकतो, अशी तक्रार युनायटेड गोवन्स फाऊंडेशनचे सरचिटणीस अविनाश तावारिस यांनी खाण खाते, मुख्य नगर नियोजक, मुख्य वनपाल व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सचिवांकडे नोंदविली आहे.

या अधिकाऱ्यांना पाठविलेल्या तक्रारीत तावारिस यांनी बेकायदेशीर खाण सुरू करण्यासाठी हा रस्ता बनविला जात असल्याचे म्हटले आहे. डोंगर कापल्यामुळे तेथील नैसर्गिक झरे व पाण्याचे स्रोत नष्ट होण्याची भीती आहे. ‘मळकर्णे भागातील शेतांना महत्त्वाचा पाणीपुरवठा याच जलस्रोतांमधून होतो.

गोवा सरकारने गावासाठी 30 कोटी रुपये खर्च करून येथे जलसिंचन प्रकल्प उभारला आहे. या भागात खाणी सुरू झाल्या, तर शेतीवर व गावांतील विहिरींवर निश्‍चितच वाईट परिणाम होईल. जंगलतोडीची छायाचित्रेही तावारिस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाठविलेली आहेत. स्थानिक पंचायतीने त्यांना दिलेल्या माहितीनुसार येथे खाण सुरू करण्याचा प्रयत्न चालू आहे.

बेकायदा रस्त्याबाबत पंचायत अनभिज्ञच !

सरपंच राजेश गांवकर यांनी ‘गोमन्तक’ला दिलेल्या माहितीनुसार डोंगरावर चालू असलेल्या रस्त्याच्या कामाची कोणतीही माहिती पंचायतीला नाही. आम्ही येत्या मंगळवारी तेथे चालू असलेल्या कामाची पाहणी करणार आहोत. ‘या भागात वर्षांपूर्वी मँगनीजची खाण चालू होती. ती पूर्ववत सुरू करण्यासाठी आवश्‍यक त्या मान्यता कंपनीला मिळाल्या आहेत का, याची आम्हाला माहिती नाही.

परंतु खाणींमुळे शेती व जलस्रोतावर परिणाम होईल, यासंदर्भातील तक्रारी पंचायतीकडे पोहोचल्या आहेत.‘ या भागातील शेतीला लागणारे पाणी याच डोंगरावरून उपलब्ध होत असल्याने तेथे खाणी सुरू करणे निश्‍चितच धोकादायक आहे, असेही गावकर म्हणाले.

आधी खाणच नव्हती !

मळकर्णेच्या या भागात कोणतीही खाण चालू नव्हती. दहा वर्षांपूर्वी जर तेथे खाण चालू होती असे कोणी म्हणत असेल तर ती खाण बेकायदेशीर असेल;लिलाव न करता येथे कोणतेही खा ण चालू करता येणार नाही. दुसऱ्या बाजूला विचार करता जर रस्ता केला जात असेल तो बेकायदा खाण धंद्यासाठीच आहे, असेही मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT