Movement of Congress workers on Canacona-Margao National Highway Dainik Gomantak
गोवा

काँग्रेस कार्यकर्त्यांनी अभियंत्यांच्या कार्यालयात टेकली पाठ, कारण...

काँग्रेस कार्यकर्त्यांनी विचारला महामार्ग प्रशासनाला जाब

दैनिक गोमन्तक

राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. पुन्हा बहुताने भाजपने राज्यात सरकार स्थापन केले आहे. अशातच पुन्हा कॉंग्रेस राज्यात विरोधीपक्ष म्हणून सक्रिय होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काणकोण ते मडगाव या राष्ट्रीय महामार्गाच्या (National Highway) दुर्दशेबाबत काँग्रेसने महामार्ग प्रशासनाला जाब विचारला आहे.

याआधी देखील कॉंग्रेसने (Congress) याठिकाणी पाठपुरावा केला होता. मात्र याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे सरचिटणीस जनार्दन भंडारी यांच्या नेतृत्वाखाली काणकोणातील (Canacona) नागरिकांनी अभियंत्यांच्या आल्तिनोतील कार्यालयात पाठ टेकवत अनोखे आंदोलन केल्याचे दिसत आहे.

दरम्यान, रस्त्याच्या कामाच्या पाठपुराव्याला अधिकारी ‘शून्य प्रतिसाद’ देत असल्याचे भंडारी यांनी सांगितले. आम्ही पीडब्ल्यूडीच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो. मात्र ते रस्ता पूर्ण करण्याबाबत कोणताही प्रतिसाद देत नाहीत. तसेच नव्याने बांधलेल्या मनोहर पर्रीकर बायपाससह NH 66 वरील सर्व प्रलंबित रस्त्यांची कामे सुरू करण्याची मागणी जनार्दन भंडारी यांनी केली. अधिकारी कंत्राटदारांकडून लाच घेतात आणि त्यामुळे ते कामाकडे दुर्लक्ष करून त्यांना हवे तसे वागतात असा आरोप देखील यावेळी त्यांनी केला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी देखील यावेळी जनार्दन भंडारी यांनी केली.

दरम्यान, टोनीनगर-सावर्डे येथील स्थानिकांनी आज पाण्याची वाढीव बिले आल्याने बाणसाय येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर मोर्चा नेला. भरमसाठ बिले आल्याने गोंधळ उडाला असून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तीन महिन्यांची वाढीव बिले एकत्रित आल्याने ती कशी भरावी, असा संतप्त सवाल स्थानिक उपस्थित करू लागले आहेत.

यासंदर्भात 25 रोजी पाणी खात्याच्या कार्यालयात लेखी तक्रार दाखल करून त्यावर तोडगा काढावा, असे म्हटले होते. मात्र संबंधित खात्याकडून कोणताच प्रतिसाद नसल्याने अखेर आज मोर्चा आणावा लागला, असे सर्वेश सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT