Moti Dongor Slum  Gomantak Digital Team
गोवा

Moti Dongor Slum: कोमुनिदाद जाणार कोर्टात !

मोती डोंगर पुनर्वसन : खंडपीठात सादर केलेल्या ‘त्या’ शपथपत्राचे काय ?

गोमन्तक डिजिटल टीम

Moti Dongor Slum: शहराजवळील मोतीडोंगर येथील झोपडपट्टी बदनाम वस्ती म्हणून कुप्रसिद्ध आहे.

या ठिकाणचे पुनर्वसन करण्याची सरकारने पुढे आणलेल्या योजनेला जमीन मालक असलेल्या स्थानिक कोमुनिदादचा तीव्र विरोध आहे.

२०१२ साली राज्य सरकारने ही बेकायदेशीर वस्ती पाडून टाकण्याचे गोवा खंडपीठात शपथपत्र दिले होते. त्याचे काय झाले? हा सवाल आता उपस्थित झाला आहे.

या झोपडपट्टीत बेकायदेशीर आणि समाज विरोधी व्यवहार सुरू असल्याचा दावा करून दोन वकिलांनी खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती.

त्यावेळी तत्कालीन मनोहर पर्रीकर यांच्या सरकारने सहा महिन्यांच्या कालावधीत ही अवैध झोपडपट्टी पाडून टाकू, असे आश्‍वासन एका शपथपत्राद्वारे न्यायालयात सादर केल्यानंतर ही याचिका निकाली निघाली.

मात्र, त्यानंतर सरकार प्रशासनाने कागदी घोडे नाचवले आणि प्रत्यक्षात कोणतीही कारवाई केली नव्हती.

हा सर्व निवडणूक जुमला !

न्यायालयात जाण्यासंदर्भात कोमुनिदादने आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही. मात्र, सरकारच्या पुनर्वसन योजनेला विरोध करण्यासाठी आमची सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची तयारी आहे, अशी सूचक प्रतिक्रिया मडगाव कोमुनिदादचे ॲटर्नी सेलेस्तीन नोरोन्हा यांनी दिली.

तर हा सर्व निवडणूक जुमला असल्याची शक्यता मडगावचे माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांनी व्यक्त केली.

‘मडगाव शहरात असंख्य झोपडपट्ट्या असताना फक्त मोती डोंगरावरील झोपडपट्टीचेच पुनर्वसन का?’ असा सवाल त्यांनी केला.

२५१ घरांना बजावली होती नोटीस

२०१२ मध्ये सरकारने खंडपीठात मोती डोंगर येथील झोपडपट्टी हटविण्याचे आश्‍वासित केल्यानंतर ही करवाई मार्गी लावण्यासाठी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी म्हणून एन. डी. अगरवाल यांची नियुक्ती केली.

त्यानंतर दक्षिण गोवा कोमुनीदाद प्रशासकाकडून २५१ घरांना नोटिसाही गेल्या होत्या. मात्र, नंतर ही करवाई बारगळली.

याच मुद्याचा आधार घेऊन स्थानिक कोमुनिदाद न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे.

‘सिने लता’जवळ ज्या झोपड्या होत्या, त्यांचे रिंग रोड प्रकल्प मार्गी लावताना पुनर्वसन करा, असे सुचविले होते. मात्र, अजून ते झाले नाही. आझाद नगरी येथील लोकही अजून तात्पुरत्या पुनर्वसन जागेत राहत आहेत. या दोन झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन अग्रक्रमाने करण्याची गरज असताना त्यांना डावलून मोती डोंगरावरील झोपडपट्टीचे पुनर्वसन कसे होते ? आपल्या मुलांसाठी ही राजकीय मतांची बेगमी का ?

सावियो कुतिन्हो, माजी नगराध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT