Goa Women’s Premier League: गोवा महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सलग दोन सामने गमावल्यानंतर पणजी जिमखान्याने अखेर मंगळवारी रात्री विजयाची चव चाखली. त्यांनी जीनो ड्रॅगन्सला ४८ धावांनी हरविले.
पर्वरी येथील जीसीए मैदानावर पूमन खेमनार हिची जबरदस्त आक्रमकता पणजी जिमखान्याच्या विजयात निर्णायक ठरली. महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरतर्फे खेळलेल्या या २८ वर्षीय खेळाडूने ३ चौकार व ५ उत्तुंग षटकारांच्या मदतीने अवघ्या २७ चेंडूंत नाबाद ५२ धावा केल्या. तीच सामन्याची मानकरी ठरली.
पणजी जिमखान्याने आता एक विजय व दोन पराभवाची नोंद केली असून जीनो ड्रॅगन्सला स्पर्धेत पहिला सामना जिंकल्यानंतर सलग दुसरा पराभव पत्करावा लागला.
संक्षिप्त धावफलक
पणजी जिमखाना: २० षटकांत ३ बाद १६३ (मुक्ता मगरे ५९, रेषा कोरगावकर १९, शिखा पांडे २३, पूनम खेमनार नाबाद ५२, पूर्वजा वेर्लेकर ३-१३)
वि. वि. जीनो ड्रॅगन्स: २० षटकांत सर्वबाद ११५ (प्रगती सिंग ५०, अनुजा पाटील २१, शिखा पांडे ३-२७, सेजल सातार्डेकर २-१५).
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.