पैशांच्या बदल्यात नाणी, सोन्याची बिस्किटे देण्याचे आमिष; पर्वरीत गुंतवणूकदारांची 5.80 कोटींची फसवणूक

लोकांकडून कंपनीत गुंतवणूक घेऊन येण्यासाठी त्यांनी पर्वरी आणि इतर भागातील लोकांना एजंट म्हणून नेमणूक केली होती.
Goa Crime News
Goa Crime Newsdainik gomantak
Published on
Updated on

Goa Crime News: कंपनीत पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवून सुमारे 05 कोटी 79 लाख 77 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कंपनीच्या मालकाविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

लोकांकडून कंपनीत गुंतवणूक घेऊन येण्यासाठी त्यांनी पर्वरी आणि इतर भागातील लोकांना एजंट म्हणून नेमणूक केली होती.

अक्षय अनंत सावंत ( रा.प्रभू एन्क्लेव्ह, सुकूर, मूळ रा. मुंबई) याच्या विरोधात पर्वरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पर्वरी पोलिसांनी (Porvorim Police) दिलेल्या माहितीनुसार, अक्षय सावंत याच्याविरुद्ध पर्वरी येथील मोहमद शरीफ वासिम खान आणि इतर चौघांनी फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे.

गुंतवणूक घेऊन येण्यासाठी अक्षयने मोहमद आणि इतरांची एजंट म्हणून नेमणूक केली होती. श्री व्यंकटेश्वर बुलियन गोल्ड नामक कंपनीसाठी त्यांच्यामार्फत गुंतवणूकदारांकडून एकूण 05 कोटी 79 लाख 77 हजार रुपये एवढी रक्कम गोळा करून आपल्या कंपनीत हस्तांतरित केली होती.

Goa Crime News
GWPL: दहशतवादाला भीक न घालता 'ती'ने जपले क्रिकेट प्रेम; जम्मू-काश्मीरच्या लेकीची गोव्यात शतकी खेळी

पैसे दिल्यानंतर त्याबदल्यात कंपनीतून स्वस्तात सोने (नाणी, बिस्किट) देण्याची हमी अक्षयने दिली होती. दरम्यान, अक्षयने पैसे देण्यास टाळाटाळ केली व तक्रारदारांना या व्यवहारासंबंधात संशय आला. वारंवार मागणी करून देखील त्याने सोने किंवा रक्कम देण्यास नकार दिला. हा सर्व व्यवहार फेब्रुवारी 2023 मध्ये झाल्याची माहिती समोर आली आहे.

तक्रारदारांनी पर्वरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अक्षयविरुद्ध भारतीय दंड संहिता 420 कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com