Mother Son Meet in Madgaon Dainik Gomantak
गोवा

Mother Son Meet in Madgaon : चिमुकल्याची आईपासून ताटातूट; सुरक्षारक्षकाने 'अशी' घडवली मायलेकाची भेट

सुरक्षारक्षकाने दाखवलेलं प्रसंगावधान ताटातूट झालेल्या आई आणि मुलाला पुन्हा एकत्र आणण्यासाठी मोलाचं ठरलं आहे.

सुशांत कुंकळयेकर

Mother Son Meet in Madgaon : मायलेकरांची झालेली ताटातूट आजपर्यंत आपण अनेक सिनेमे, मालिकांमधून पाहिली असेल. असाच काहीसा प्रकार गोव्यातही आज पाहायला मिळाला. मडगावात रुग्णालयात झालेली मायलेकरांची ताटातूट काही तासांनंतर पुन्हा घडून आली. सुरक्षारक्षकाने दाखवलेलं प्रसंगावधान ताटातूट झालेल्या आई आणि मुलाला पुन्हा एकत्र आणण्यासाठी मोलाचं ठरलं आहे.

मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात एका चिमुकल्याची आईपासून ताटातूट झाली होती. भरकटलेल्या एका लहान मुलाची सुरक्षा रक्षकाने सतर्कता दाखविल्याने परत आईशी गाठ पडली. एक महिला आज सकाळी आपल्या मुलाला घेऊन इस्पितळात आली होती. मात्र ती आपले काम करण्यात गर्क असताना तिचे लहान मूल तिथून निसटल्याने दोघांची ताटातूट झाली.

यावेळी ड्यूटीवर असलेल्या पाईक वेळीप या सुरक्षारक्षकाने भांबावलेल्या अवस्थेत फिरणारे हे मूल पाहून त्याने त्याला आपल्या ताब्यात घेतले. यानंतर त्याने सहायक सुरक्षा पर्यवेक्षक सगुण सालेलकर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना झाल्या प्रकाराची कल्पना दिली. त्यानंतर सुरक्षा पर्यवेक्षकांनी त्या मुलाच्या आईचा शोध घेण्यास सुरुवात केली. मुलाची आईही हरवलेल्या आपल्या मुलाचा शोध घेत होती. तिच्याशी गाठभेट झाल्यावर मुलाला तिच्या स्वाधीन करण्यात आलं. आपली हरवलेली आईं सापडल्यावर ते मुलही आपल्या मातेला बिलगले. काहीकाळ या सर्व प्रकारामुळे रुग्णालयात मात्र मायलेकाच्या भेटीचा प्रसंग पाहून सारेच भावूक झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

Farmagudi Accident: फार्मागुडी येथे कार आणि दुचाकीचा अपघात, महिला जखमी

Horoscope: आठवडा विशेष: चंद्र राशीनुसार 'प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक' स्थिती कशी राहील? सर्व 12 राशींचं भविष्य वाचा

Omkar Elephant: ओंकार हत्ती 'शांत'च! उपवनसंरक्षकांकडून 'अग्रेसिव्ह' चर्चांना पूर्णविराम, रेस्क्यूसाठी चार ठिकाणं निवडली

SCROLL FOR NEXT