GMC  Dainik Gomantak
गोवा

कोमातील 19 वर्षीय मुलाच्या न्यायासाठी मातेची आर्त हाक

बागा किनाऱ्यावर टोळक्याच्या हल्ल्यामुळे तरुण कोमात; गोमेकॉत उपचार सुरु

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये कोमात असलेल्या 19 वर्षीय मुलाच्या आईने न्यायासाठी आर्त हाक दिली आहे. शाहीन सौदागर असं या मातेचं नाव असून आपल्या मुलाला मारहाण करुन कोमात जाण्यास भाग पाडणाऱ्या आरोपींवर कडक कारवाईची मागणी तिने केली आहे. 19 वर्षांच्या या मुलावर एका टोळक्याने बागा किनाऱ्यावर हल्ला केला होता, ज्यानंतर तो कोमात गेला आहे. सध्या त्याच्यावर बांबोळीतील गोमेकॉच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पणजीतील आझाद मैदानावर सोमवारी या मातेने माध्यमांसमोर आपली व्यथा मांडली. यावेळी तिने आपल्यासह आपल्या मुलांवरील आपबिती कथन केली. बागा येथील एका क्लबसमोर आपल्या तीन मुलांसह उभी असताना अचानक सुरक्षारक्षकासह काहीजणांनी आपल्या मुलांवर हल्ला केला. यावेळी मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता आपल्यालाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे. याचवेळी आशिष पालेकर नावाच्या आरोपीने आपल्या 19 वर्षीय मुलाच्या डोक्यावर हॉकी स्टीकने प्रहार केला, ज्यामुळे त्याने रक्ताची उलटी केली आणि डोक्याला गंभीर इजा झाल्याने कोमामध्ये गेला. आपल्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याचा आरोप महिलेने केला आहे.

दरम्यान महिलेने पोलीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप केला आहे. पोलीस सांगत आहेत की तपास सुरु आहे, मात्र आरोपी अजूनही मोकाट आहेत आणि अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही असंही महिलेचं म्हणणं आहे. पोलिसांनी महिलेचे सर्व आरोप फेटाळून लावत आरोपीला कधीच अटक झाली असून तो सध्या कोलवाळ जेलमध्ये असल्याचं स्पष्ट केलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या धमकीमुळे परिसरातील एकही दुकानदार या घटनेचं सीसीटीव्ही देण्यास तयार नसल्याचा आरोपही महिलेने केला आहे. 7 मे रोजी घटना घडल्यानंतर लगेच याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती. मात्र अजूनही पोलिसांनी आरोपींवर कोणतीही कारवाई न केल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह असल्याचं महिलेचं म्हणणं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT