Goa Medical College IVF Dainik Gomantak
गोवा

IVF Triplets Goa: जुळं नाही, तिळं! गोमेकॉत 'आयव्हीएफ'ची कमाल; दोन मुली, एका मुलासह माता सुखरूप

Triplets born via IVF in Goa: गर्भधारणेसाठी विनामूल्य आयव्हीएफ उपचार मिळवून एका महिलेने गोमेकॉमध्ये सिझेरियन शस्त्रक्रियेमार्फत तीन नवजात बाळांना जन्म दिला

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यातील वंध्यत्वग्रस्त जोडप्यांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय आशेचा किरण ठरले आहे. त्यातच गोमेकॉच्या 'इन विट्रो फर्टिलायझेशन' (आयव्हीएफ) केंद्राने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.

या उपक्रमांतर्गत, एका मातेने तीन-दोन नव्हे, तर तीन बाळांना जन्म दिला. यामध्ये दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. गोमेकॉची ही एक मोठी वैद्यकीय उपलब्धी असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

मंत्री राणे म्हणाले की, गर्भधारणेसाठी विनामूल्य आयव्हीएफ उपचार मिळवून एका महिलेने गोमेकॉमध्ये सिझेरियन शस्त्रक्रियेमार्फत तीन नवजात बाळांना जन्म दिला. ही घटना केवळ एका कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण गोव्यासाठी आशेचा संदेश घेऊन आली आहे.

गोमेकॉच्या आयव्हीएफ केंद्राचा उद्देश हा आर्थिक व मानसिक ओझं झेलणाऱ्या जोडप्यांना मातृत्व-पितृत्वाचा आनंद मिळवून देणे आहे, हे या यशामुळे अधिक प्रभावीपणे सिद्ध झाले आहे. या उपचारांमुळे अनेकांच्या जीवनाला नवीन दिशा मिळू शकते.
- विश्वजीत राणे, आरोग्य मंत्री

मुलाचे वजन २.३२ किलो, मुलीचे वजन १.७७ किलो आणि दुसऱ्या मुलीचे वजन १.५२५ किलो आहे. तिघेही सुखरूप आहेत. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही नवजात बाळे आणि माता पूर्णपणे स्थिर आणि आरोग्यदृष्ट्या सुरक्षित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT