काणकोण: तामणे-लोलये येथील माय-लेकीचा घराशेजारी असलेल्या तळीत बुडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मुलगी अंकिता पागी हिचा मृतदेह मिळाला आहे तर आईचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना संध्याकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिकांनी अंकिता हिला पाण्याबाहेर काढून प्रथमोपचार करून तोंडातून पाणी बाहेर काढले. मात्र तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. ताबडतोब तिला इस्पितळात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ती विवाहित होती. अग्निशामक दलाचे जवान अंकिताच्या आईचा शोध घेत आहेत.
सार्वजनिक बांधकाम खातेचे निवृत्त कर्मचारी असलेल्या अंकिताचे वडील आनंद पागी यांना काही दिवसांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. पण तत्पूर्वी ते आपल्या पत्नीला दुचाकीवरून काणकोण सामाजिक आरोग्यकेंद्रात तपासणीसाठी घेऊन गेले होते. घरी आल्यानंतर त्यांना झटका आला होता. या गोष्टीला आपणच कारणीभूत आहे, आपल्यामुळेच नवऱ्याला झटका आला असा समज अंकिताच्या आईने करून घेतला होता.
त्यामुळे ती सैरभैर झाली होती. दुसरीकडे आपल्या वडिलांच्या देखरेखीसाठी त्याची विवाहित मुलगी अंकिता माहेरी आली होती. आज संध्याकाळी त्यांचे काही नातेवाईक आनंद पागी यांची विचारपूस करण्यासाठी घरी आले. मात्र घरी माय-लेक दिसली नसल्याने त्यांनी चौकशी केल्यावर शेजाऱ्यांनी धावधाव सुरू केली. त्यानंतर घराशेजारी असलेल्या तळीकडे सर्वांनी धाव घेतली. पोलिसांनाही कल्पना देण्यात आली. अंकिताला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक आर. फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.