फोंडा तालुक्यातील भाजप मंडळाने केला मगोला तीव्र विरोध

विरोधाची धार तीव्र: फोंडा, शिरोडा, मडकई आणि प्रियोळ भाजप मंडळ आक्रमक
Goa Politics : Maharashtrawadi Gomantak Party & BJP
Goa Politics : Maharashtrawadi Gomantak Party & BJPDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: राज्यात सतेवर येऊ पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मगो पक्षाने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र फोंडा तालुक्यातील चारही मतदारसंघांतील भाजप मंडळाने मगोला तीव्र विरोध केला आहे. कोणत्याही स्थितीत मगोला सत्तेत घेऊ नका, अशी जोरदार मागणी भाजपच्या फोंडा, शिरोडा, मडकई व प्रियोळ या मतदारसंघांतील मंडळ पदाधिकाऱ्यांनी फोंड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत करून वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधले आहे.

Goa Politics : Maharashtrawadi Gomantak Party & BJP
पर्वरीत पाण्याची कमतरता भासणार नाही

मगो पक्षाने भाजपविरोधात राज्यात उमेदवार उभे केले. भाजप उमेदवारांना पाडण्यासाठी मोठे षड्‌यंत्र रचले. फोंडा, शिरोडा, प्रियोळ या मतदारसंघांत भाजप उमेदवारांच्या विजयात खोडा घातला. मडकईत भाजपविरोधात जहरी टीका केली. तरीही एक मडकई सोडल्यास फोंडा, शिरोडा आणि प्रियोळ या तिन्ही मतदारसंघांत भाजपचेच उमेदवार निवडून आले ते केवळ सरकारची कार्यपद्धती आणि सर्वसामान्य नागरिकांचे हित जपून गोव्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी भाजप सरकार यशस्वी ठरले यामुळेच.

भाजपचे 20 उमेदवार निवडून आले. तीन अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे मगोच्या पाठिंब्याची गरजच नाही, असे भाजप मंडळाने स्पष्ट केले आहे. जिंकून येण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत. तसेच मतदारांनी योग्य साथ दिली. त्यामुळेच भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले, असेही यावेळी सांगण्‍यात आले.

निकाल लागण्यापूर्वी मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी स्वतःच ‘किंगमेकर’ असल्याचे जाहीर केले होते. डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री असतील तर मगो पाठिंबा देणार नाही अशी वल्गना करणाऱ्या सुदिन यांनी आता कशी काय नांगी टाकली, असा सवाल भाजप मंडळ अध्यक्ष प्रदीप शेट, सूरज नाईक, दिलीप नाईक, सुदेश भिंगी व इतर भाजप मंडळ पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

Goa Politics : Maharashtrawadi Gomantak Party & BJP
गोवा सरकार: तरुण तेजपालविरोधात आज सुनावणी

निर्णय सोपविला केंद्रीय नेत्यांवर

भाजप मंडळ पदाधिकाऱ्यांचा रोष वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोचला आहे. राज्यातील भाजप नेते मगोचा पाठिंबा घेण्यास अनुकूल नाहीत. मात्र हा निर्णय केंद्रीय नेत्यांवर सोपविला असल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितल्‍याचे प्रदीप शेट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

फोंड्यातील तीन आमदारांचा विरोध

फोंडा मतदारसंघाचे आमदार रवी नाईक, शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर व प्रियोळच आमदार गोविंद गावडे यांनी तर मगोपला कोणत्याही स्थितीत भाजपने जवळ करू नये असे म्हटले आहे. त्यामुळे मगो-भाजप एकत्र येणे मुश्कीलीचे ठरले आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com