Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: धक्कादायक! पोटच्‍या मुलाचा मातेने केला खून; मृतदेह बॅगेत भरून झाली पसार

Goa Crime: सिकेरी येथे एका हॉटेलमध्‍ये उतरलेल्‍या महिलेने आपल्‍या 4 वर्षांचा बाळाचा खून केला व मृतदेह बॅगेत भरून पसार होण्‍याची धक्कादायक घटना समोर आली.

दैनिक गोमन्तक

Goa Crime: सिकेरी येथे एका हॉटेलमध्‍ये उतरलेल्‍या महिलेने आपल्‍या 4 वर्षांचा बाळाचा खून केला व मृतदेह बॅगेत भरून पसार होण्‍याची धक्कादायक घटना समोर आली. रुम सोडल्‍यानंतर रुमबॉयला कॉटवर रक्ताचे डाग दिसल्‍याने ही घटना उघडकीस आली. दरम्‍यान, चित्रदुर्ग येथे संशयित महिलेला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्‍या माहितीनुसार, शनिवारी दुपारी दोन महिला सिकेरी येथील एका हॉटेलमध्ये पर्यटक बनून उतरल्या होत्‍या. चार वर्षीय बाळाचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस व फॉरेन्सिक विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास दोघींपैकी एका महिलेने हॉटेल सोडल्याचे तेथील सुरक्षारक्षकाने सांगितले.

दुसऱ्या महिलेचा अद्याप शोध लागला नसून, खुनात दोन्‍ही महिलांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संशयित महिलेने हॉटेल सोडल्‍यानंतर रुमची स्वच्छता करण्यासाठी आलेल्‍या रुमबॉयला कॉटवर रक्ताचे डाग दिसले.

त्‍याने तात्काळ ही माहिती हॉटेलच्या व्यवस्थापकांना दिली. फरार झालेल्या एका संशयित महिलेला महिलेस कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिचा ताबा घेण्यासाठी कळंगुट पोलिसांचे पथक तिकडे रवाना झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT