Ganesh Parab Dainik Gomantak
गोवा

Mormugao: कायद्याचा रक्षक बनला भक्षक; महिलेच्या विनयभंगप्रकरणी PSI वर गुन्हा दाखल

मुरगाव पोलीस उपनिरीक्षकावर वनयभंगाची तक्रार

दैनिक गोमन्तक

वास्को: मुरगाव हार्बर कोस्टल पोलीस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश परब (वय 59) याच्याविरोधात एका 35 वर्षीय महिलेने विनयभंगाची तक्रार केली आहे. याप्रकरणात मुरगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. विनयभंगाचा गुन्हा नोंद झालेला संशयित आरोपी परब हा उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे.

(Mormugao psi ganesh parab Case filed against for molestation )

मुरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शनिवारी (दि. 1) उशिरा रात्री पीडित महिलेने विनयभंग झाल्याची तक्रार नोंदवली. सविस्तर वृत्त असे की, हार्बर कोस्टल पोलीस स्थानकावर उपनिरीक्षक म्हणून कार्यरत गणेश परब शुक्रवारी (दि. 30) दुपारी मित्राला भेटण्यासाठी गेला. तेथे त्याने मित्राबरोबर मद्यपान केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानंतर परब याने बोगदा स्मशानभूमीजवळील परिसरात जेथे पीडित महिला राहते, त्या खोलीत घुसून विनयभंग केला, अशी तक्रार पीडितेने नोंदवली आहे.

परब याला सेवेतून निवृत्त होण्यास फक्त तीन महिने राहिले

या प्रकरणी मुरगाव पोलिसांनी परब विरोधात भादंस 354, 448 या कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. विनयभंग प्रकारणात गुन्हा नोंद झालेला गणेश परब बोगदा येथील पोलीस क्वॉर्टरमध्ये राहतात, अशी माहिती मुरगाव पोलिसांनी दिली. विनयभंगाचा गुन्हा नोंद झालेल्या संशयित गणेश परब याला पोलीस सेवेतून निवृत्त होण्यास फक्त तीन महिने राहिले आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मुरगावचे निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास चालू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT