वाहनधारकांची कसरत थांबेना; जलवाहिनी फुटल्याचा परिणाम

पेव्हर्स आजपासून बसविणार
Pipeline Repair
Pipeline Repairसंग्रहित
Published on
Updated on

पणजी : भाटले परिसरातील फुटलेली जलवाहिनी बदलली आणि खड्डा भरून झाला असला तरी रस्ता मात्र वाहतुकीस व्यवस्थित सुरु झाला नसल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मळा ते तांबडीमाती मार्गावरील वाहतूक शनिवारी चौथ्या दिवशीही वळवण्यात आली होती. त्यामुळे वाहनधारक अल्तिनो, मारुती मंदीरमार्गे ये-जा करीत होते.

Pipeline Repair
Narcotic Supplier: अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी फोंड्यात एकाला अटक

बुधवारी संध्याकाळी भाटलेतील टायनी टॉट्स शाळेजवळ जलवाहिनी फुटली होती. मलनिस्सारण विभागाच्यावतीने वाहिनी टाकण्याचे काम ड्रिलिंगद्वारे सुरू असताना जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे सांतआंद्रे आणि सांताक्रूझ व पणजीच्या काही भागातील पाणीपुरवठा बंद झाला होता.

बुधवारी सायंकाळपासून जलवाहिनीची फुटलेली भाग बदलण्याचे काम सुरू होते, ते गुरुवारीही सुरू राहिले. गुरुवारी दिवसभर जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते, त्यानंतर सायंकाळी काँक्रिटीकरणाचा दाब वाहिनीच्या भोवती टाकल्याने ते सुकण्याकरिता शुक्रवारचा पूर्ण दिवस घेतला गेला. शनिवारी तो खड्डा पूर्ण भरला, परंतु खड्ड्यात भरलेली मातीवर दाब देऊन त्यावर पेव्हर्स टाकण्याचे काम रविवारी करणार असल्याचे संबंधित कंत्राटदाराने सांगितले.

भाटलेत काही भागात शिरले होते पाणी

जलवाहिनी फुटल्याने घरात अचानक पाणी शिरल्याने तिवरे यांच्या कुटुंबांची मोठी धावपळ उडाली. घरातील पाणी बाहेर काढताना त्यांना नाकीनाउ झाले होते. पाण्यात फर्निचर, चार्जर्स, लॅपटॉप व इतर साहित्य बुडाल्याने त्यांचे नुकसानही झाले होते.

गेल्या चार दिवसांपासून त्रास

बुधवारपासून ते शनिवारपर्यंत या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना मारुती मंदीर, आल्तिनो अशा मार्गे ये-जा करावे लागत होते. त्याशिवाय सटी मंदीर परिसरात राहणाऱ्या वाहनांनाही कदंबा बसस्थानकाकडे जाण्यासाठी आल्तिनोचाच मार्गाशिवाय पर्याय नव्हता. गेली चार दिवसांपासून वाहतूक वळविल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रविवारी खड्ड्यावरील मातीवर दाब घालून रस्त्याच्या समांतर ती आणून पेव्हर्स बसविण्याचे काम केले जाईल, असे कंत्राटदाराने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com