Mormugao Pre-Monsoon Work  Dainik Gomantak
गोवा

Pre-Monsoon Work: अखेर मुरगाव प्रभाग 22 मधील मान्सूनपूर्व कामे पूर्ण; नगरसेवक सुदेश भोसले यांचा पुढाकार

प्रभागातील गटारांची साफसफाईची कामे पूर्ण करण्यात आली

दैनिक गोमन्तक

Mormugao Pre-Monsoon Work : मुरगाव पालिका प्रभाग २२ मध्ये नगरसेवक सुदेश भोसले यांच्याकडून मान्सूनपूर्व कामांना गती देण्यात आली असून या प्रभागातील गटारांची साफसफाईची कामे पूर्ण करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांच्या अभावी मुरगाव पालिकेच्या २५ प्रभागांची मान्सूनपूर्व कामांचा खेळखंडोबा झालेला पाहण्यात येतो. सफाई कामगार मिळत नसल्याने प्रत्येक प्रभागातील नगरसेवकाला सफाई कामगारांच्या प्रतिक्षेत रहावे लागते. त्यामुळे मान्सूनपूर्व कामे रेंगाळत गेली.

दरम्यान पालिका प्रभाग २२ चे नगरसेवक सुदेश भोसले यांनी आपल्या प्रभागातील गटारांची साफ सफाई करण्याचे काम हाती घेतले आहे. मुख्य रस्त्यांच्या शेजारी असलेल्या गटारांत प्लास्टिक पिशव्या, बाटल्यांचा खच भरला होता. तो सफाई कामगारांच्या मदतीने नगरसेवक भोसले यांनी काढून घेतला.

तसेच प्रभाग २२ मध्ये येत असलेल्या दोन गृह निर्माण मंडळ वसाहतींमध्ये पावसाळ्यापूर्वीची मोठी कामे करण्यात आली आहेत. दरम्यान प्रभागातील पावसाळ्यापूर्वीची कामे राबविण्यासाठी मुरगावचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रीग्स, उपनगराध्यक्ष रामचंद्र कामत, मुख्याधिकारी जयंत तारी, तसेच परिवहन व पंचायत मंत्री माविन गुदिन्हो आणि वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांच्या सर्वतोपरी सहकार्याबद्दल नगरसेवक सुदेश भोसले यांनी आभार व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa To London Flight: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! गोवा ते लंडन विमानसेवा सप्टेंबर अखेरपर्यंत पुन्हा सुरु होणार; पर्यटनमंत्री खवंटेंची माहिती

Goa Real Estate: गुरुग्राम नको, आता 'गोवा'च! लक्झरी व्हिलांचा आसगाव बनतंय हॉटस्पॉट; गुंतवणूकदारांना मिळतोय बंपर फायदा

Goa Assembly Live: 'जुन्या गोव्यासाठी मास्टर प्लॅनची मागणी' युरी आलेमाओ

Karnataka: कशासाठी? कुटुंबाची इज्जत राखण्यासाठी! HIV पॉझिटीव्ह भावाचा बहीण आणि दाजीने केला खून

Damodar Saptah Fair: रंगांचा कल्लोळ! चालीरीतींची, संस्कृतीच्या उत्सवाची झळाळती झलक; वास्कोतील फेरी

SCROLL FOR NEXT