Court Order, summons  Canva
गोवा

Mormugao Port: मुरगावातील कोळसा हाताळणी प्रकरणी राज्‍य, केंद्राला नोटीस! 4 आठवड्यांत उत्तर सादर करण्‍याचा आदेश

Mormugao Port coal handling: सदर याचिका संजय रेडकर व अन्‍य चार नागरिकांनी दाखल केली आहे. मुरगाव बंदरात दरवर्षी सुमारे १०.६४ दशलक्ष टन कोळसा हाताळला जातो.

Sameer Panditrao

पणजी: मुरगाव बंदरात कोळसा हाताळणीचा विस्तार रोखावा आणि त्‍यास ‘हरित बंदर’ घोषित करावे अशी मागणी करणाऱ्या एका जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्‍य सरकार, केंद्र सरकार आणि संबंधित संस्थांना चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश देत नोटीस बजावली आहे. दरम्‍यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ सप्टेंबर रोजी होणार आहे.

सदर याचिका संजय रेडकर व अन्‍य चार नागरिकांनी दाखल केली आहे. मुरगाव बंदरात दरवर्षी सुमारे १०.६४ दशलक्ष टन कोळसा हाताळला जातो. ही क्षमता २०३५ पर्यंत ४२.१ दशलक्ष टनांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव आहे. ही वाढ स्थानिक लोक, त्‍यांचे आरोग्य, पर्यावरण, मासेमारी आणि पर्यटनावर अतिशय गंभीर परिणाम करणारी ठरेल, असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.

मुरगाव बंदर हे लोकवस्तीच्या जवळ आहे. तेथे धोकादायक मालाची हाताळणी करणे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा भंग आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद २१ (जीवन व स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार) तसेच अनुच्छेद ४८ (अ) व ४७ नुसार सरकारवर पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे, पण त्यात राज्य यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

आरोग्य, पर्यावरण संकटात

कोळशामुळे उडणारी धूळ आणि त्यातून तयार होणारे सूक्ष्मकण हे श्‍‍वसनाच्या रोगांना कारणीभूत ठरतात. तसेच कोळसा हाताळणीमुळे हवा, पाणी आणि जमिनीचे प्रदूषण होते. त्याचा विपरीत परिणाम पारंपरिक मासेमारी, जलसृष्‍टी, स्थानिक लोक व पर्यावरणावर होतो, असे मुद्दे याचिकेच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WI vs PAK: 18 धावांत 6 विकेट्स...! पाकिस्तानच्या फलंदाजांचा वेस्ट इंडिजच्या 'या' पठ्ठ्यानं उडवला फज्जा; डेल स्टेनचा मोडला 13 वर्ष जुना रेकॉर्ड

Rahul Gandhi: 'मृत' मतदारांसोबत राहुल गांधींची 'चाय पे चर्चा'! निवडणूक आयोगावर पुन्हा साधला निशाणा; VIDEO

Aahana Kumra: 'पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली, गोव्यात मला अटक झाली असती'; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला अनुभव

Pune Crime: रंगकाम करताना घरमालकाला लावला चुना; पुण्यात 4 लाखांची चोरी करणाऱ्या प्रमोदला गोव्यात अटक

Horoscope: गुरुवारी 'गजलक्ष्मी योग'चा शुभ संयोग! 'या' 5 राशींच्या लोकांसाठी उद्याचा दिवस खूप खास, होणार मोठा धनलाभ; भगवान विष्णूचीही राहणार कृपा

SCROLL FOR NEXT