Mormugao Municipality employees decide to go on aggressive indefinite strike  Dainik Gomantak
गोवा

मुरगाव पालिका कर्मचारी आक्रमक, बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय

नागरिकांची होणार गैरसोय

दैनिक गोमन्तक

आज सोमवारी वेतन खात्यात जमा झाले नसल्याने मुरगाव नगरपालिकेचे कर्मचारी आक्रमक बनले असून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय पक्का केला आहे. पालिका अधिकारी यासंबंधी काय निर्णय घेणार यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दोन आठवड्यापूर्वी दोन दिवसात बँकेतून (Bank) कर्ज काढून खात्यात वेतन जमा केले जाईल, असे आश्वासन देऊनही मुरगाव पालिका मुख्याधिकारी जयंत तारी आश्वासनपूर्ती करू न शकल्याने मुरगाव पालिका कर्मचाऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले होते. दोन दिवसात वेतन खात्यात जमा न झाल्यास काम बंद ठेवण्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला होता.

कामगार संघटनेचे अध्यक्ष केशव प्रभू हे वेतन प्रश्‍नी लक्ष घालत नसल्याने ही स्थिती उद्भवली असल्याचा आरोप पालिका कर्मचाऱ्यांनी वारंवार करत आहे.नंतर तिन दिवसांपूर्वी पालिका कामगार संघटनेचे सचिव अनिल शिरोडकर यांनी मुरगाव पालिका (Municipality) मुख्याधिकारी जयंत तारी व नगराध्यक्ष दामोदर कासकर यांची भेट घेऊन वेतनाविषयी विचारपूस केली असता आज सोमवारी वेतन खात्यात जमा केले जाईल असे आश्वासन मुख्याधिकारी जयंत तारी यांनी दिले होते.

दरम्यान, मुरगाव (Mormugao) पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे प्रलंबित वेतन आज सोमवारी खात्यात जमा न झाल्याने कर्मचारी वर्गाने बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालिका अधिकारी या संबंधी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच कर्मचारी वर्ग देखील काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. कारण कर्मचारी वर्ग संपावर गेल्यास नागरिकांची गैरसोय होणार आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT