exit poll results 2022 : गोव्यात पुन्हा भाजपचे सरकार होणार स्थापन

काही वेळा एक्झिट पोल चुकीचे ठरतात
goa assembly elections exit poll results
goa assembly elections exit poll results Dainik Gomantak
Published on
Updated on

Exit Poll 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान पार पडले. संध्याकाळी मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल सादर होत आहेत. हे एक्झिट पोल उत्तर प्रदेश तसेच पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी आहेत. एक्झिट पोलमधून निवडणुकीच्या निकालाचे चित्र समोर येते. मात्र, काही वेळा एक्झिट पोल चुकीचे ठरतात. (information about Exit poll 2022)

goa assembly elections exit poll results
फोटोकॉपी मशिन लावून घरीचं छापल्या नोटा, मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश

इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार गोव्यात पुन्हा एकदा भाजपचे (BJP) सरकार स्थापन होणार असल्याचे चित्र दिसत आहे. इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार, राज्यात भाजपला 16-22 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसला (Congress) 11-17 जागा मिळू शकतात. आम आदमी पक्षाला (AAP) 0-2 जागा मिळू शकतात तर इतरांना 4-5 जागा मिळण्याची शक्यता आहे.

goa assembly elections exit poll results
फोटोकॉपी मशिन लावून घरीचं छापल्या नोटा, मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश

एक्झिट पोलबाबत मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत?

भारतामध्ये 1998 मध्ये प्रथमच एक्झिट पोलबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने कलम 324 अन्वये, 14 फेब्रुवारी 1998 रोजी संध्याकाळी 5 ते 7 मार्च 1998 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलचे निकाल प्रकाशित करण्यास किंवा प्रदर्शित करण्यास मनाई केली होती. 1998 च्या सार्वत्रिक निवडणुकीचा पहिला टप्पा 16 फेब्रुवारीला आणि शेवटचा टप्पा 7 मार्च रोजी पार पडला. यानंतर वेळोवेळी निवडणूक (election) आयोग एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करतो. लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार, मतदानाचे सर्व टप्पे पूर्ण होईपर्यंत एक्झिट पोल दाखवता येत नाहीत. मतदानाचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर अर्ध्या तासानंतर एक्झिट पोलचे निकाल दाखवले जाऊ शकतात. - यावेळीही निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी एक्झिट पोल मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. यामध्ये 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 7 मार्च रोजी सायंकाळी 6.30 पर्यंत एक्झिट पोलचे निकाल दाखवण्यास बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक आयोगाची ही मार्गदर्शक तत्त्वे केवळ टीव्ही चॅनेल्स किंवा मीडियालाच लागू नाहीत तर सर्वसामान्यांनाही लागू आहेत. कायद्यानुसार, निवडणूक प्रक्रियेदरम्यान जर कोणी एक्झिट पोल किंवा निवडणुकीशी संबंधित कोणतेही सर्वेक्षण दाखवले किंवा निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले तर त्याला दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

2004 मध्ये एक्झिट पोल चुकीचे सिद्ध झाले होते. एक्झिट पोलचे निकाल कधी कधी अगदी अचूक असतात तर कधी चुकीचे असल्याचे सिद्ध होते. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत, एक्झिट पोलचे निकाल आणि निवडणुकीचे निकाल अगदी विरुद्ध होते. 2004 मध्ये, एक्झिट पोलमध्ये असे म्हटले जात होते की भाजप सर्वात मोठा पक्ष बनेल आणि एनडीएचे सरकार स्थापन होईल, परंतु जेव्हा निकाल आले तेव्हा एनडीए 200 चा आकडाही पार करू शकला नाही आणि 189 पर्यंत कमी झाला. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला आणि यूपीएचे सरकार स्थापन झाले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीतही एनडीए आणि यूपीए यांच्यात कडवी स्पर्धा असल्याची चर्चा होती. पण जेव्हा निकाल आले तेव्हा यूपीएला २६२ आणि एनडीएला १५९ जागा मिळाल्या. 2014 आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांचे एक्झिट पोल बरोबर असल्याचे सिद्ध झाले. दोन्ही एक्झिट पोलमध्ये भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला होता आणि निकालही तसेच राहिले. भाजपने 2014 मध्ये 282 तर 2019 मध्ये 303 जागा जिंकल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com