Mormugao Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Mormugao: मुरगाव पालिकेची विक्रमी कामगिरी! एका दिवसामध्ये 26 लाख महसुलाची भर; 4 महिन्यांत 18.30 कोटी जमा

Mormugao Municipal Council: मुरगावचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक व इतरांच्या प्रयत्नांमुळे मुरगाव पालिकेच्या तिजोरीत गतवर्षीपेक्षा दुप्पट महसुलाची भर पडली आहे.

Sameer Panditrao

वास्को: मुरगावचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक व इतरांच्या प्रयत्नांमुळे मुरगाव पालिकेच्या तिजोरीत गतवर्षीपेक्षा दुप्पट महसुलाची भर पडली आहे. गतवर्षी ८ कोटी ४० लाख महसूल फेब्रुवारी ते मे चार महिन्यांमध्ये मिळाला होता. परंतु यंदा फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत १८ कोटी ३० लाख महसूल गोळा झाला आहे.

काऊंटरवर तर एका दिवसामध्ये २६ लाख रुपये भाडेपट्टी, परवाना शुल्क व इतर करांच्या रूपाने गोळा झाला होता. हा एक प्रकारचा विक्रमच असल्याचे मानले जाते. मुरगाव पालिका आर्थिक डबघाईतून हळूहळू कात टाकू लागली आहे. मुख्याधिकारी नाईक यांच्या प्रयत्नामुळे कर्मचारी, कामगार, रोजंदारी कामगार व इतरांच्या हातावर वेळेवर वेतन पडू लागल्याने ते सर्वजण समाधान व्यक्त करीत आहेत. थकबाकी योग्यरीत्या वसूल होत नसल्याने पालिकेच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम झाला होता.

त्यामुळे कर्मचारी, कामगारांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजी होती. तथापि, आता त्यांची ही नाराजी दूर झाल्याचे दिसून येत आहे. महिन्याच्या अखेरच्या किंवा दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी वेतन त्यांच्या हाती पडत आहे. मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार चौदाव्या वित्त अंतर्गत मुरगाव पालिकेला १४.५० कोटी रुपये अनुदान मिळाले होते.

त्यापैकी ९५ टक्के रक्कमेचा उपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये काही ना काही विकासकामे चालीस लागली. जी ५ टक्के रक्कम उरली आहे, तिचा वापर पुढील काळात होईल. पंधराव्या वित्त अंतर्गत ११.५० कोटी रक्कम पालिकेला मिळणार आहे. त्यापैकी ४ कोटी ४२ लाख रुपये खर्च करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. पालिका मंडळाला विश्‍वासात घेउन हा निधी खर्च करण्यात येईल.

सरकारकडून मिळालेला निधी, अनुदान रक्कमेचा वापर न केल्याने ती रक्कम पडून होती. या ‘अनटाय ग्रँड’ साठी कोणतेही प्रस्ताव पाठविण्यात न आल्याने वापरण्यात आला नव्हता. आता काही प्रस्ताव पाठविण्यात आल्याने सुमारे ४५ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. लवकरच इतरही प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत, जेणेकरून या रक्कमेचा विकासकामांसाठी योग्य वापर होणार आहे, असे नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session Live: 1972 पूर्वी उभारलेली 1 लाख घरे होणार कायदेशीर, परिपत्रक जारी

Viral Video: 'सैय्यारा' पाहून अंगात आला हिरो! प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी 'फाइट' मोड ऑन, थिएटरबाहेर दोन तरुणांमध्ये रंगलं प्रेमयुद्ध

Government Bans OTT Platforms: केंद्र सरकारचा 'डिजिटल स्ट्राइक'! अश्लील कंटेंट दाखवणार्‍या Ullu, ALTT सह 25 OTT अ‍ॅप्सवर घातली बंदी

Dovorlim: दवर्लीत 175 जणांना नोटीस; पंचायतीची बेकायदेशीर बांधकामांची तपासणी, Video

Goa Assembly Session: रस्ते रुंदीकरणाचे विधेयक याच अधिवेशनात सादर होणार, CM प्रमोद सावंतांचं आश्वासन

SCROLL FOR NEXT