Mormugao: मुरगावातील 41 इमारती धोकादायक स्थितीत, संबंधित मालकांना नोटिसा; मात्र कारवाई करण्यास पालिकेस अपयश

Mormugao Dangerous Buildings: पालिकेने सात-आठ वर्षापूर्वी देखील येथील धोकादायक इमारतीची पाहणी करून संबंधितांना त्या इमारती खाली करण्यासंबंधी नोटिसा दिल्या होत्या.
Mormugao Dangerous Buildings
Mormugao Dangerous BuildingsDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: मुरगाव पालिकेने येथील जुन्या व असुरक्षित इमारतींची पाहणी करून ४१ इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. पालिकेने सात-आठ वर्षापूर्वी देखील येथील धोकादायक इमारतीची पाहणी करून संबंधितांना त्या इमारती खाली करण्यासंबंधी नोटिसा दिल्या होत्या. यापैकी पालिकेच्या मालकीची जनता व एक हाउसिंग सोसायटीची पुष्पांजली इमारती पाडण्यात आल्या आहेत. इतर इमारती मात्र अद्याप जैसे थे आहेत.

धोकादायक इमारतींची पाहणी करणे, संबंधितांना नोटिसा देणे व त्यांनी त्या नोटिसा घेणे हा खेळ दरवर्षी चालूच आहे. पालिकेच्या तीन चार इमारतीही असुरक्षित आहेत. पालिकेचे कर्मचारी ज्या इमारतीत राहतात, त्या इमारतींची पाहणी करून अहवाल मिळाल्यावर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

त्या इमारतींच्या दुरुस्तीचा खर्च मोठा असेल, तर त्या इमारती पाडून त्याठिकाणी नवीन इमारती बांधण्याचा पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सात आठ वर्षापूर्वी एका इमारतीचा सज्जा तसेच एका इमारतीमधील फ्लॅटच्या वरचे छत पूर्णपणे कोसळले होते. त्यावेळी फ्लॅटमध्ये कोणीच राहत नसल्याने दुर्दैवी घटना घडली नाही.

या घटनेनंतर येथील असुरक्षित इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आल्याने पालिकेने दखल घेताना असुरक्षित इमारतींची पाहणी फेब्रुवारी २०१७ सुरु केली. त्यावेळी तीसपेक्षा अधिक इमारती असुरक्षित असल्याच्या कारणास्तव संबंधितांना नोटिसा पाठविण्यात आल्या. त्यावेळी मुख्याधिकारी दीपाली नाईक होत्या, त्यांनी या इमारतीसंबंधी दक्षिण जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती दिली होती. तथापि, त्यानंतरही संबंधितांकडून कोणतीही हालचाली झाल्या नाही.

Mormugao Dangerous Buildings
Mormugao House Tax: वाढीव घरपट्टी परत करा! मुरगाववासीय आक्रमक; 4 वर्षे उलटूनही रक्कम पालिकेकडून प्रलंबित

पालिकेच्या चार इमारती

दुर्दशा झालेल्या इमारतींच्या यादीमधून पालिकेच्या मालकीच्या चार इमारतीही सुटल्या नाहीत. त्यामुळे या इमारतींच्या भक्कमपणासंबंधी तपासणी करावी व त्यासंबंधीचा अहवाल द्यावा अशी विनंती गोवा इंजिनिअरिंग कॉलेजला तत्कालीन मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी केली होती.त्यानंतर त्या इमारतीची डागडुजी सुरु करण्यात आली. परंतु धोका अद्याप टळलेला नाही.

Mormugao Dangerous Buildings
Mormugao: हा विषय गंभीर! मुरगाव नगरसेवकांचे प्रतिपादन; बेकायदा बांधकामांबाबतची बैठक ढकलली पुढे, आदेशाची प्रत प्रलंबित

काही इमारती अत्यंत धोकादायक

ज्या इमारतींना नोटिसा देण्यात आल्या होत्या, यापैकी काही इमारतींचा काही भाग कधीही कोसळू शकेल असा स्थितीत आहेत. काही इमारती यापूर्वीच रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तर काही इमारतीमध्ये अद्याप काहीजण जिवावर उदार होऊन त्यामध्ये राहतात. काही इमारतीसंबंधीचा वाद न्यायालयात असल्याने त्यासंबंधी इमारत मालकांना निर्णय घेता येत नाही. तर काही इमारती या हाउसिंग सोसायटीच्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com