Mormugao Municipal Dainik Gomantak
गोवा

Mormugao Municipal: मुरगाव पालिकेचे 27 प्रभाग, इच्छुकांची धावपळ सुरू; विधानसभा निवडणुकीतील कामगिरीवर उमेदवारांच्या पालिका तिकिटांचे गणित

Mormugao Municipal Council 27 wards: मुरगाव पालिकेच्या प्रभागांची संख्या २५ वरून २७ वर गेल्याने इच्छुक उमेदवार तसेच मावळते नगरसेवक-नगरसेविका यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: मुरगाव पालिकेच्या प्रभागांची संख्या २५ वरून २७ वर गेल्याने इच्छुक उमेदवार तसेच मावळते नगरसेवक-नगरसेविका यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पालिका निवडणुका विधानसभा निवडणुकांनंतर होणार असल्याने इच्छुकांना प्रथम विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी काम करून नेतृत्वाची मर्जी संपादन करावी लागणार आहे. त्यामुळे वाढलेल्या दोन प्रभागांनंतरही तिकीट कोणाला मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

मुरगाव पालिका मंडळाची पहिली निवडणूक १९७० मध्ये १५ प्रभागांसह झाली होती. त्यानंतर १९८५ मध्ये प्रभागसंख्या १८, १९९५ मध्ये २०, तर २०१५ मध्ये २५ करण्यात आली.

मार्च २०२६ मध्ये मतदारसंख्येच्या आधारावर प्रभागांची संख्या कमी होण्याची शक्यता व्यक्त झाली होती. त्यामुळे अनेक इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. मात्र लोकसंख्येच्या निकषानुसार अखेरीस दोन नव्या प्रभागांची भर पडून संख्या २७ वर पोहोचल्याने इच्छुकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

सध्या मुरगाव मतदारसंघात नऊ, वास्को मतदारसंघात बारा आणि दाबोळी मतदारसंघात चार प्रभागांचा समावेश होता. २०२१ च्या पालिका निवडणुकीत तत्कालीन आमदार मिलिंद नाईक, कार्लुस आल्मेदा आणि मंत्री मॉवीन गुदिन्हो यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर विजय मिळवला होता. मात्र २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली. संकल्प आमोणकर आणि दाजी साळकर आमदार झाले, तर मिलिंद नाईक व कार्लुस आल्मेदा यांचा पराभव झाला.

मुरगाव मतदारसंघात मिलिंद नाईक यांचे अनेक समर्थक अजूनही त्यांच्याशी निष्ठावान असल्याने आमदार संकल्प आमोणकर नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे वास्को मतदारसंघात कार्लुस आल्मेदा यांचे समर्थक आता आमदार दाजी साळकर यांच्यासोबत सक्रिय दिसत आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढल्याने तिकीट वाटप अधिकच गुंतागुंतीचे होण्याची चिन्हे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT