Mormugao Dainik Gomantak
गोवा

Mormugao Port Coal Pollution: कोळसा हाताळणीविरोधात एकमत; मुरगाव पालिकेत ठराव मंजूर, ठोस कृती आराखड्याचा आग्रह

Sankalp Amonkar coal roadmap: मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी थांबविण्यासाठी योग्य ‘रोडमॅप’ तयार करा, असे आवाहन मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी बुधवारी मुरगाव पालिका मंडळाच्या खास बैठकीत केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी थांबविण्यासाठी योग्य ‘रोडमॅप’ तयार करा, असे आवाहन मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी बुधवारी मुरगाव पालिका मंडळाच्या खास बैठकीत केले. कोळसा हाताळणी बंद करण्याच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देण्याचे आश्र्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांनी कोळसा नकोच अशी भूमिका घेऊन त्यासंबंधीचा ठराव घेतला. 

सध्या येथे कोळसा हाताळणी व प्रदूषण विषय पेटला आहे. त्या पार्श्वभूमिवर मुरगाव पालिका मंडळाने कोळसा हाताळणीमुळे होणारे परिणाम यासंबंधी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी खास बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस कंपन्यांचे प्रतिनिधी, अधिकारी बैठकीस उपस्थित न राहिल्याबद्दल आमोणकर यांच्यासह काही सदस्यांनी संताप व्यक्त केला.

कोळसा नकोच

नगरसेवक दीपक नाईक यांनी आपण २०१५ मध्ये नगराध्यक्ष असताना कोळसा हाताळणी बंद करण्यासंबंधी ठराव घेतल्याचे स्पष्ट केले. नगरसेवक यतीन कामुर्लेकर, फ्रेडिक्स हेन्रिक्स, सुदेश भोसले, मोती मोंतरो यांनीही कोळसा नकोच असल्याचे स्पष्ट केले.

मात्र ते एका दिवसांमध्ये शक्य नसल्याचे सांगून रोडमॅपची गरज असल्याचे सांगितले. नगरसेविका शमी साळकर यांनीही कोळसा प्रदूषणाला विरोध असल्याचे सांगितले. विकास हवाच, परंतु आरोग्यावर परिणाम करणारा नको, असे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: 30 एप्रिलपर्यंत 'नो रिस्क'! ग्रहांची बदलली चाल, मेष राशीचं वाढलं टेन्शन; चुकीच्या निर्णयामुळे अडकू शकता संकटाच्या चक्रव्यूहात

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

VIDEO: वैमानिकाची एक चूक अन् 8 प्रवाशांचा खेळ खल्लास, 5 मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं; इंडोनेशियातील बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर क्रॅश

Watch Video: अय्यरच्या 'सुपरमॅन' अवतारावर रोहित-सूर्याचे विस्फारले डोळे, चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; श्रेयसचा धडाकेबाज कॅच व्हायरल

Omkar Elephant: 'ओंकार'चा उगवे भागात धुमाकूळ, संतप्त नागरिकांकडून सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT