Thivim physical assault case
Thivim physical assault caseDainik Gomantak

Goa Crime: संतापजनक! 80 वर्षाच्या वृद्धेवर वारंवार अत्याचार; 50 वर्षीय आरोपीचा जामीन न्यायालयाने फेटाळला

Thivim Crime News: वृद्धेवर (८० वर्षे) वारंवार अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या ५० वर्षीय प्रवीण कुडाळकर या आरोपीचा जामीन अर्ज पणजी येथील पॉक्सो न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
Published on

पणजी: थिवी येथील वृद्धेवर (८० वर्षे) वारंवार अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या ५० वर्षीय प्रवीण कुडाळकर या आरोपीचा जामीन अर्ज पणजी येथील पॉक्सो न्यायालयाने फेटाळून लावला आहे. मंगळवारी न्यायाधीश डॉ. पूजा कवळेकर यांनी हा आदेश दिला.

सरकारी पक्षाने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने थिवी येथील माडेल भागात राहणाऱ्या वृद्धेच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश करून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. ही घटना २० जून २०२५ रोजी उघडकीस आली. आरोपीने सलग तीन दिवस तिच्यावर अत्याचार केल्याचे देखील तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Thivim physical assault case
Goa Crime: केरळचा पर्यटक गोव्यात आला अन्...! पणजीतील लॉजमध्ये आढळला मृतदेह; पोलीस तपास सुरू

न्यायालयाने आपल्या आदेशात या गुन्ह्याचे स्वरूप ‘अतिशय गंभीर’ असल्याचे नमूद केले. एका हतबल ज्येष्ठ नागरिकेसोबत घडलेला हा गुन्हा समाजाला धक्का देणारा आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

Thivim physical assault case
Goa Crime: मडगावात खळबळ! ओल्ड मार्केट सर्कल परिसरात आढळला कुजलेला मृतदेह; ओळख पटवण्याचं पोलिसांसमोर आव्हान

आरोपी कुडाळकर याच्या वकिलांनी जामिनासाठी दोन मुख्य मुद्दे मांडले होते. पहिला म्हणजे संशयित मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे आणि दुसरा म्हणजे पीडितेने वेगवेगळ्या कलमांखाली नोंदवलेल्या जबाबांमध्ये तफावत आहे. मात्र, आरोपपत्रात या दाव्याला पुष्टी देणारा कोणताही वैद्यकीय पुरावा सादर करण्यात आलेला नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com