sankalp On Mormugao Ammonia tank Dainik Gomantak
गोवा

Mormugao News : अमोनिया टाकीचे त्वरित मॉकड्रिल करा; आमोणकरांचा सरकारला 'अल्टिमेटम'

तसे न झाल्यास अमोनियाची वाहतूक थांबवण्याचा सरकारला इशारा

Rajat Sawant

Mormugao News : जेटी येथील मुरगाव बंदर क्षेत्रामध्ये असलेली अमोनिया साठा टाकी म्हणजे एक ‘टाईम बाँब’ आहे. त्यामुळे सरकारने याठिकाणी त्वरित मॉकड्रिल करावे अशी मागणी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी केली आहे.

तसेच यासंबंधिची कागदपत्रे सादर करण्यासाठी त्यांनी प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. तसे न झाल्यास बंदरात आणि बंदरातून होणारी अमोनियाची वाहतूक थांबवण्याचा इशारा दिला आहे.

जेटी येथील मुरगाव बंदर क्षेत्रामध्ये असलेली अमोनिया साठा टाकीचे सरकारने मॉकड्रिल व टाकीच्या सुरक्षेसंबंधी संयुक्त तपासणी करण्याची गरज असल्याचे आमदार आमोणकर यांनी 8 दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र याची दखल सरकारने घेतलीच नाही.

मुरगाव बंदरात अमोनिया टाकी असल्याने त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक जाऊ शकत नाही. त्या अमोनिया टाकीसंबंधी नियमितपणे मॉकड्रिल झाल्याचे आम्ही ऐकले नाही. ज्याप्रमाणे शहर भागातील इंधन साठवणुकीच्या टाक्या दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आल्या, त्याप्रमाणे अमोनिया टाकीही हलविण्यात यावी.

द्रव स्वरूपातील अमोनियाची टँकरद्वारे रस्तामार्गे वाहतूक केली जाते. त्यावेळी त्या टँकरच्या मागे एस्कॉर्ट व अग्निशमन दल असावे लागते. हा नियम पाळण्यात येत नसल्याचे ते म्हणाले.

या टाकीच्या आसपास दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे एखादी आपत्ती घडली, तर ती मुरगाव मतदारसंघालाच नव्हे, तर इतर परिसरही प्रभावित करू शकेल, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Liquor Seized: ट्रकला लागली 'आग', तस्करीचा झाला पर्दाफाश; धारगळमधून 60 लाखांची दारू जप्त

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, सभापती तवडकरांना मिळणार मंत्रीपद, सिक्वेरा देणार राजीनामा; गणेश गांवकराकडे सभापती पदाची धूरा

Goa Cricket: गोव्याची दिल्लीत दमदार कामगिरी, क्रिकेट संघांची आगेकूच; मुली उपांत्य फेरीत दाखल

Goa Live News: वृद्ध महिलेच्या घराचे छप्पर कोसळण्याच्या मार्गावर; समाजसेवक शिवप्रसाद शिरोडकर करणार मदत

Scheduled Tribal Area: गोव्यात अनुसूचित आदिवासी क्षेत्राची गरज! तवडकरांचे प्रतिपादन; राष्ट्रपतींकडे मांडला इतिहास

SCROLL FOR NEXT