Zalor Beach: दुर्दैवी! झालोर बीचवर गरोदर पोरपोईजचा मृत्यू, जेट स्कीचा धक्का लागल्याचा संशय

शवविच्छेदन तपासणी नव्याने स्थापन झालेल्या मरीन सेलमधील रेंज फॉरेस्ट ऑफिसरच्या देखरेखीखाली करण्यात आली.
Porpoise Representive Image
Porpoise Representive ImageDainik Gomantak
Published on
Updated on

झालोर समुद्रकिनाऱ्यावर एक गरोदर पोरपोईजचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तम आरोग्य, सुदृढ असलेली गरोदर पोरपोईज मृतावस्थेत आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Pregnant porpoise found dead at Zalor, Salcete)

तसेच, पोरपोईजला जेट स्कीचा धक्का बसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. लहान आकाराचा व्हेल माशाला पोरपोईज असे म्हटले जाते. दृष्टी सागरी जीवरक्षकांनी बुधवारी संध्याकाळी गोवा वनविभागाला मृत पोरपोईजची माहिती दिली.

Porpoise Representive Image
Mumbai Terror Threat: मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी; NIAला मेल, सर्वत्र अलर्ट जारी

पोरपोईजचे शवविच्छेदन केल्यानंतर ती गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. तपासणी केल्यानंतर 4-6 महिन्यांचा गर्भ आला आहे. शवविच्छेदन तपासणी नव्याने स्थापन झालेल्या मरीन सेलमधील रेंज फॉरेस्ट ऑफिसरच्या देखरेखीखाली करण्यात आली.

पोरपोईजच्या डोक्‍याला जखम झाल्याचे आढळून आले आहे. पोरपोईजच्या बोट किंवा जेट स्कीचा जोरदार धक्का बसल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Porpoise Representive Image
Uttar Pradesh: धक्कादायक! फेसबुकवर तरुणाने केले आत्महत्येचे लाईव्ह स्ट्रीम, मग पुढे झाले असे काही...

उत्तर आणि दक्षिण गोव्यात समुद्रकिना-यावर सागरी प्राणी मृत होणे किंवा अडकूण पडणे यासारख्या घटना घडत असतात. याची माहिती सागरी बचाव कार्य करणाऱ्या तसेच, वनविभागाला स्थानिक नागरिकांमार्फेत दिली जायची. दरम्यान, यासाठी राज्यव्यापी सागरी वन्यजीव प्रतिसाद आणि देखरेख नेटवर्कची स्थापना करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com