Mormugao Dainik Gomantak
गोवा

Mormugao: शांतादुर्गा कला आणि क्रीडाच्या गणरायाचे उद्या मंगळवारी होणार विसर्जन

सांस्कृतिक कार्यक्रम लहान मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे केले आयोजन

दैनिक गोमन्तक

वास्को: संभाजीनगर नॉन- मॉन येथील शांतादुर्गा कला आणि क्रीडा संघाच्या गणरायाचे उद्या विसर्जन होणार आहे. या संघाची आरसे वापरून बनवलेली 12.5 फूट गणेश मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

(Mormugao: Ganesha immersion of Shantadurga Kala and Krida Sangha to be held on September 20)

संभाजीनगर नॉन- मॉन मुरगाव येथील शांतादुर्गा कला आणि क्रीडा संघ गेली 12 वर्षे गणेश चतुर्थी 21 दिवस साजरी करत आला आहे. या काळात श्री गणेश पूजना व्यक्तिरिक्त येथील हौशी कलाकारांनी माशेल, कुंभारजुवे येथील कलाकारांची प्रेरणा घेत प्रत्येक वर्षी भव्य दिव्य अशी श्री गणेश मूर्ती वेगवेगळ्या वस्तू वापरून साकारण्याचा मनोदय बाळगला आहे.

यानुसार गेली बारा वर्षे त्यांनी श्रींच्या लहान मूर्ती पूजनाबरोबर 10 फुटी ते 12.5 फुटी पर्यंत गणेश मूर्तीचा देखावा साकारला जातो. गणेश चतुर्थीच्या अडीच ते तीन महिन्यापूर्वी हा देखावा तयारीला कलाकार सुरू करतात. गेल्या 12 वर्षाच्या कार्यकाळात नॉन- मॉन येथील हौशी कलाकारांनी जर्मन झिगी, लाकडाचा भुसा, क्युलिंग पेपर, बीटस्, दोरी, बेडे (सुपारी) वेळे तसेच वुड चीप्स वापर करून गणेश मूर्ती साकारल्या आहेत.

कलाकार संतोष नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश देखावा तयार करण्यासाठी त्यांना एक ते दीड लाख इतका खर्च होत असल्याचे त्यांनी सांगितले. हा खर्च लकी कुपन ठेवून उचलला जात असल्याचे सांगितले. तसेच संभाजीनगर राजाला वेगवेगळी बक्षिसे प्राप्त झाली असल्याचेही ते म्हणाले. त्यात कला आणि संस्कृती खाते आयोजित स्पर्धाचे बक्षीस या शांतादुर्गा कला आणि क्रीडा संस्थेच्या संघाच्या संभाजीनगरच्या राजाला प्राप्त झाली आहे.

दरम्यान 21 दिवसीय या संभाजी नगर राजाचे मंगळवारी विसर्जन होणार आहे. या काळात धार्मिक कार्यक्रमाबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम लहान मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, तसेच प्रसादाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. गेल्या 21 दिवसात शेकडो भाविकांनी श्रींचे दर्शन घेऊन श्रींच्या कृपाप्रसादाचा लाभ घेतला. मंगळवारी दिंडी सहित शहरात मिरवणूक काढल्यानंतर श्रींचे खारीवाडा येथे समुद्रात विसर्जन करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: गोव्यात अपघातांचे सत्र थांबेना! 2 अपघातांत 2 तरुण ठार; डिचोलीत ‘हिट ॲण्ड रन’ची घटना

युनिटी मॉलपाठोपाठ डेल्‍टिन कॅसिनो, गेरा प्रकल्पाला विरोध! सरकारसमोर आव्‍हान; श्रीपाद नाईकांवर चिंबलवासीयांचा प्रश्नांचा भडीमार

Ranji Trophy: अर्जुन तेंडुलकर 1, तर राजशेखर शून्यावर बाद! 'दर्शन'ची एकाकी झुंज; गोव्याचा सलग तिसरा पराभव

Rashi Bhavishya: ..हाच तो दिवस! शुभवार्ता मिळणार; 'या' राशींनी तयार रहा

Bajirao Peshwa: निजाम पुण्यात घुसला, बाजीरावांनी आपला मोर्चा औरंगाबादकडे वळवला; अपराजित सेनापतीची ऐतिहासिक लढाई

SCROLL FOR NEXT