Morjim: Protection wall on national highway is dangerous Dainik Gomantak
गोवा

राष्ट्रीय महामार्गावरील संरक्षण भिंतच ठरतेय धोकादायक

संरक्षण भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय...

दैनिक गोमन्तक

मोरजी(Morjim): राष्ट्रीय महामार्गाचे काम सदैव वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे. पेडणे तालुक्यातील पत्रादेवी ते धारगळ पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग 66 च्या रस्त्याचे काम सुरु आहे, महाखाजन येथे जी संरक्षण भिंत उभारली जात आहे तिचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय युवा नेते वकील जितेंद्र गावकर यांनी व्यक्त करून सरकारने यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

धारगळ म्हहाखाजन येथील शापोरा नदीच्या किनारी राष्ट्रीय रस्त्याच्या बाजूला संरक्षण भिंत बांधली जात आहे तिची जाडी खूपच कमी असल्याने नागरिकही या कामाबाबतीत संशय व्यक्त करत आहेत. रस्त्याची माती हि संरक्षण भींत रोखू शकेल कि नाही याबाबत संशय आहे. सध्या जमिनीला मातीतच थेट कॉंक्रीट घालण्याचे काम सुरु आहे. हे काम चालू असताना कुणीही अधिकारी अभियंते सुपरवायझर यांचा कामाच्या साईडला पत्ताच नाही.

या विषयी युवा नेते वकील जितेंद्र गावकर यांनी घटनास्थळी पाहणी करून बोलताना स्थानिक आमदारांचे आणि अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने कामाचा दर्जा खालावलेला आहे. या कामाची सरकारने उच्चपातळीवर चौकाशी करून कंत्राटदारावर कारवाई आणि गुन्हा नोंद करावा करावी अशी मागणी केली.

संरक्षण भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय...
सध्या जमिनीला मातीतच थेट कॉंक्रीट घालण्याचे काम सुरु आहे

पुनरावृत्ती टाळावी

एम व्ही आर कंपनीचे काम कसे निकृष्ट दर्ज्याचे आहे याचा अनुभव नागरिकांनी गेल्यावर्षी पोरस्कडे येथे घेतलेला आहे, अशीच रस्त्याच्या बाजूला तेरेखोल नदीकिनारी संरक्षण भीत मोडली होती त्यातील 100 मीटर लांबीची भिंत कोसळून रस्ताही तेरेखोल नदीत गेला होता, त्याची पुनरावृत्ती तर महाखाजन धारगळ येथील भिंतीची होणार नाही ना अशी भीती व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिक रोहिदास हरमलकर यांनी प्रतिक्रिया देताना या भिंतीचे काम चालू असताना संबधित अधिकारी किंवा पर्यवेक्षक असणे आवश्यक आहे परतू या ठिकाणी कोणीच नसल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT