Morjim Dainik Gomantak
गोवा

Morjim News : भर पावसात पर्यटकांची सतावणूक? स्‍थानिकांचा आरोप

Morjim News : मोपा वाहतूक पोलिसांबाबत संताप

गोमन्तक डिजिटल टीम

Morjim News :

मोरजी, पत्रादेवी-पेडणे येथे राष्ट्रीय महामार्ग ६६ वर मोपा वाहतूक पोलिसांकडून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची तसेच गोमंतकीयांचीही वाहने अडवून मोठ्या प्रमाणात सतावणूक करण्‍यात येत आहे. विशेष म्‍हणजे भर पावसात वाहनचालकांना तिष्‍ठत उभे रहावे लागते.

पत्रादेवी चेकनाक्यापासून १०० मीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर मोपा वाहतूक खात्याचे आठ ते नऊ पोलिस उभे राहून पर्यटकांच्या गाड्या अडवतात. राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे मध्येच वाहने अडविल्‍यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

महाराष्ट्रातून पत्रादेवी चेकनाका पार करून गोव्यात येताना तसेच गोव्यातून महाराष्ट्रात जाताना मोपा वाहतूक खात्याचे पोलिस महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी उभे राहून पर्यटकांची मोठ्या प्रमाणात सतावणूक करत असल्‍यामुळे गोवा पोलिस खात्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर बदनाम होत आहे. तोरसे पंचायतीजवळही एका ठिकाणी उभे राहून ते पर्यटकांना अडवत असतात.

मोपा वाहतूक पोलिस आपल्या हद्दीत तीन ते चार ठिकाणी रस्‍त्‍यावर उभे राहून पर्यटकांना सतावतात. राष्ट्रीय महामार्ग असल्याने व वाहने वेगात असल्‍याने अपघात कधीही होऊ शकतो. प्रसंगी वाहतूक पोलिसांच्या जीवावरसुद्धा बेतू शकते. त्‍यामुळे वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर मध्येच उभे राहून गाड्या अडवताना आपल्‍या जीवाची काळजी घ्‍यावी, असे तोरसेचे माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ यांनी याबाबत प्रतिक्रिया व्‍यक्त करताना सांगितले. पोलिसांनी आवश्‍‍यक तेवढेच सोपस्‍कार पूर्ण करून पर्यटकांना जाऊ द्यावे, असेही ते म्‍हणाले.

पत्रादेवी येथे गोव्यात प्रवेश करत असताच वाहतूक पोलीस पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांचे स्वागत करतात. यामुळे गोवा राज्य तसेच गोवा पोलिस खात्याची बदनामी होत आहे. मुख्यमंत्री

डॉ.प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी लक्ष घालून पर्यटक तसेच स्थानिकांना दिलासा द्यावा.

- कृष्णा पालयेकर, अध्यक्ष (नवचेतना युवक संघ)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suryakumar Yadav Dance: सूर्याचा 'धुरंधर' अवतार! अक्षय खन्नाच्या 'सिग्नेचर' स्टेपवर धरला ठेका; धमाकेदार डान्सवर चाहते फिदा VIDEO

Iran War: इराणी ड्रोनचा अचूक वेध अन् कुवेतच्या स्वप्नांचा चुराडा! 'डिसॅलिनेशन प्लॅंट'वर केला भीषण हल्ला; 90 टक्के पाणीपुरवठा धोक्यात

Goa Crime: कुटुंबीयांकडून घाईघाईत अंत्यविधीची तयारी, पण... KTC बस स्थानक परिसरात खळबळ; झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

Leopard in Camurlim: कामुर्लीत बिबट्याचा वावर; वासराची शिकार केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Horoscope: एप्रिल 2026 मध्ये कोणाला मिळणार कुटुंबाची साथ? कोणाची होणार ताटातूट? जाणून घ्या 12 राशींचे भविष्य

SCROLL FOR NEXT