October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

ATM, LPG, UPI and FD Rules Change From October 1, 2026: गुरुवारपासून (1 ऑक्टोबर 2026) तुमच्या दैनंदिन जीवनात आणि खिशावर थेट परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे आर्थिक बदल लागू होणार आहेत.
October 2026 Financial Rule Changes India
October 2026 Rules ChangeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

October 2026 Financial Rule Changes India: गुरुवारपासून (1 ऑक्टोबर 2026) तुमच्या दैनंदिन जीवनात आणि खिशावर थेट परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे आर्थिक बदल लागू होणार आहेत. जर तुम्ही या बदलांकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर तुम्हाला भुर्दंड सोसावा लागू शकतो. बँकिंग, करआकारणी, एलपीजी गॅस आणि यूपीआय व्यवहारांसंदर्भातील हे नवे नियम जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

सर्वात मोठा बदल एलपीजी गॅस सबसिडीबाबत आहे. जर तुमच्याकडे गॅस कनेक्शन असेल आणि तुम्ही अद्याप बायोमेट्रिक केवायसी केली नसेल, तर 1 ऑक्टोबरपासून तुम्हाला सबसिडीचे पैसे मिळणे बंद होईल. याचा अर्थ गॅस सिलिंडर मिळणे बंद होईल असा अजिबात नाही, तर तुम्हाला आता सबसिडीशिवाय थेट मार्केट रेटने पैसे देऊन सिलिंडर घ्यावा लागेल. सबसिडीचा लाभ चालू ठेवण्यासाठी तातडीने केवायसी प्रक्रिया पूर्ण करुन घ्या.

October 2026 Financial Rule Changes India
Agniveer Rules Change: अग्निवीरांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! वीरमरण आल्यास कुटुंबाला पेन्शन किंवा नोकरी देण्याची तयारी; लवकरच नियमात होणार बदल

दुसरा महत्त्वाचा बदल स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांसाठी आहे. जर तुमच्याकडे एसबीआईचे सॅलरी पॅकेज अकाउंट असेल, तर दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून मोफत पैसे काढण्याची किंवा बॅलन्स चेक करण्याची मर्यादा दरमहा 10 वरुन 5 वर आणण्यात आली. म्हणजेच 5 पेक्षा जास्त वेळा दुसऱ्या बँकेच्या एटीएमचा वापर केल्यास तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. जनधन किंवा बेसिक खात्यांसाठी 4 मोफत व्यवहारांचे जुने नियमच लागू राहतील. यूपीआय व्यवहारांबद्दल सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. ग्राहकांसाठी 2 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचे पर्सन-टू-पर्सन (P2P) यूपीआय व्यवहार पूर्णपणे मोफत असणार आहेत आणि यासाठी कोणताही अतिरिक्त चार्ज आकारला जाणार नाही.

October 2026 Financial Rule Changes India
DGCA Ticket Rules Change: 48 तासांत मोफत कॅन्सलेशन, 21 दिवसांत मिळणार रिफंड... विमान प्रवासाचे 7 नियम बदलले; कधीपासून लागू होणार?

कर्जधारकांसाठी रिझर्व्ह बँकेची मॉनेटरी पॉलिसी बैठक 5 ते 7 ऑक्टोबर दरम्यान होणार असून यादरम्यान रेपो रेटबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. करदात्यांसाठी सीबीडीटीने 2026-27 या असेसमेंट इयरसाठी टॅक्स ऑडिट रिपोर्ट आणि आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढवून क्रमशः 21 ऑक्टोबर आणि 21 नोव्हेंबर केली, ज्यामुळे सीए आणि करदात्यांना मोठा दिलासा मिळाला.

October 2026 Financial Rule Changes India
Change In Bank Rules: लवकरच बदलणार आयकर, बँक लॉकर, म्युच्युअल फंडाशी संबंधित नियम

याशिवाय, सरकार ऑक्टोबर-डिसेंबर 2026 या तिमाहीसाठी पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, एनएससी आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना यांसारख्या पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजनांचे नवीन व्याजदर जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. तसेच, एनआरआयकडून मालमत्ता खरेदी करताना टीडीएस कापण्यासाठी आता स्वतंत्र टॅन नंबरची गरज उरलेली नाही, तुम्ही साध्या पॅन कार्डद्वारेच हे करु शकता. त्यामुळे या आगामी बदलांची योग्य माहिती ठेवा आणि सणासुदीच्या दिवसांत आपल्या आर्थिक नियोजनाची काळजी घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com